इराणवर ‘अंतिम प्रहार’,घातक प्लॅन तयार
पश्चिम आशियाचे युद्ध आता अशा वळणार पोहोचले आहे, जेथे जाभराच्या नजरा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढील पावलावर लागून राहिल्या आहेत. अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटागॉननुसार अमेरिकेचे सैन्य इराणमध्ये आठवड्यांपर्यंत चालणाऱ्या ‘जमिनी सैन्य अभियानां’ची रुपरेषा तयार करण्यात आली आहे. हा केवळ हवाई हल्ल्यांपुरती मर्यादित नसेल, तर यात इराणच्या भूमीवर अमेरिकेच्या सैनिकांची उपस्थिती आणि थेट छापेमारी सामील असू शकते. पेंटागॉनने अशा सैन्य पर्यायांवर काम सुरू आहे. हे काही पूर्ण व्यापक युद्ध नसेल, तर विशेष दल आणि चपळ कारवाई करणाऱ्या सैन्याद्वारे महत्त्वपूर्ण तळांवर हल्ला करत त्वरित परतण्याच्या रणनीतिवर विचार होतोय. हे अभियान ‘महिने नव्हे, तर काही आठवड्यां’चे असू शकते, परंतु याचा प्रभाव अत्यंत मोठा असू शकतो. अमेरिकेने यापूर्वीच हजारो सैनिक आणि मरीन कमांडोंना मध्यपूर्वेत तैनात केले आहे, जेणेकरून गरज भासल्यास त्वरित अभियान सुरू करता येईल.
टार्गेटेड स्ट्राइकची रणनीति
अमेरिकेच्या योजनेचा मुख्य उद्देश इराणच्या सैन्यक्षमतेला कमकुवत करणे आहे. याच्या अंतर्गत क्षेपणास्त्र लाँच सिस्टीम, हवाई सुरक्षा प्रणाली आणि सागरी तळांना लक्ष्य केले जाऊ शकते, जे आंतरराष्ट्रीय जलवाहतूक मार्गासाठी धोकादायक मानले जातात. सर्वात महत्त्वपूर्ण टार्गेड खार्ग बेट असून ते इराणचे सर्वात मोठे तेल निर्यात केंद्र आहे. जर या बेटावर कब्जा केल्यास किंवा याला ब्लॉकेड केल्यास इराणच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसू शकतो आणि यामुळे वाटाघाटीत अमेरिकेला आघाडी मिळू शकते. याचबरोबर होर्मुझ सामुद्रधुनीच्या आसपास इराणच्या सैन्यतळांवर छापे टाकण्याची योजनाही सामील आहे, जेणेकरून जहाजांना लक्ष्य करण्याची इराणची क्षमता कमी करता येऊ शकेल. अमेरिका ज्या पर्यायांवर विचार करत आहे, त्यात 4 मोठी सैन्य अभियानं सामील असल्याचे सांगण्यात येत आहे.
जमिनी अभियानात मोठी जोखीम
जमिनी अभियान सोपे नसेल असे तज्ञांचे मानणे आहे. इराणचे इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोर मजबूत स्थिती आहे आणि ड्रोन, क्षेपणास्त्रs तसेच सागरी हल्ल्यांद्वारे प्रत्युत्तर देऊ शकते. खासकरून खार्ग बेट यासारख्या रणनीतिक ठिकाणांवर कब्जा करणे अवघड ठरणार नसले तरीही त्याहून अवघड दीर्घकाळापर्यंत त्यावर नियंत्रण ठेवणे असणार आहे. याचमुळे अमेरिकेचे सैन्य चपळ, छोटे अन् अचूक अभियानाच्या रणनीतिवर काम करत आहे.
मध्यपूर्वेत सैन्य उपस्थिती वाढतेय
अमरिकेने वेगाने स्वत:च्या सैनिकांची तैनात वाढविली आहे. तयारी केवळ कागदावर नसून अमेरिकन मरीन आणि 82 व्या एअरबोर्न डिव्हिजनचे हजारो कमांडो पूर्वीच मध्यपूर्वेत दाखल झाले आहेत. ‘यूएसएस त्रिपोली’ यासारख्या घातक युद्धनौका अत्याधुनिक एफ-35 स्टील्थ लढाऊ विमानांसोबत समुद्रात तैनात आहेत. गरज भासल्यास युद्धाची तीव्रता वाढविणे किंवा कमी करण्याची क्षमता यामुळे अमेरिकेला प्राप्त झाली आहे.
वाढता तणाव, अनिश्चित भविष्य
एकीकडे सैन्यतयारी तीव्र होत असताना दुसरीकडे कूटनीतिक स्तरावरही प्रयत्न जारी आहेत. जर आमच्या क्षेत्रावर हल्ला झाल्यास कुठल्याही मर्यादेशिवाय प्रत्युत्तर देऊ असा इशारा इराणने दिला आहे. अशास्थितीत जमिनी अभियान सुरू झाल्यास हा संघर्ष मर्यादित राहण्याऐवजी पूर्ण क्षेत्रात मोठ्या युद्धात रुपांतरित होऊ शकतो. सध्या अमेरिकेच्या योजना कायदावर आहेत, परंतु ज्याप्रकारे सैन्यतैनात आणि रणनीतिक पर्याय तयार केले जात आहेत, त्यातून आगामी काही आठवडे या युद्धाची दिशा निश्चित करू शकतात असे संकेत मिळत आहेत.
खार्ग बेटावर कब्जा : इराणचे आर्थिक कंबरडे मोडणे.
होर्मुझ जलमार्गावर नियंत्रण : लारक बेटावर हल्ला करत सागरी मार्ग सुरक्षित करणे.
आण्विक केंद्रांवर छापे : अबू मौसा आणि आसपासच्या बेटांवर कब्जा करणे, संपृक्त यूरेनियमला जप्त करण्यासाठी सैन्यतुकडी पाठविणे.
सागरी इंटरसेप्शन : इराणचे तेल नेणाऱ्या जहाजांना समुद्रात रोखणे.
आणखी काही आक्रमक योजनांमध्ये इराणच्या आत शिरून आण्विक केंद्रांवरून उच्च संपृक्त यूरेनियमला ताब्यात घेण्यासारखे पर्यायही सामील आहेत, परंतु याचबरोबर मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ल्यांचाही पर्यायही कायम राहणार आहे.
अमेरिकेच्या विद्यापीठांना करू लक्ष्य
मध्यपूर्वेत स्थित अमेरिकेच्या विद्यापीठांना लक्ष्य करण्याची धमकी इराणच्या आयआरजीसीने रविवारी दिली आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये इराणमधील दोन विद्यापीठे उद्ध्वस्त झाल्याचा दावा यापूर्वी इराणने केला होता. या क्षेत्रातील अमेरिकेच्या विद्यापीठांना प्रत्युत्तरादाखलच्या कारवाईपासून सुरक्षित रहायचे असल्यास सोमवारी तेहरानच्या प्रमाणवेळेनुसार दुपारी 12 वाजेपर्यंत एक अधिकृत वक्तव्य जारी करत विद्यापीठांवर झालेल्या बॉम्बहल्ल्याची निंदा करावी लागेल असा इशारा आयआरजीसीने दिला आहे.
नागरिकांनी राखावे अंतर
आम्ही या क्षेत्रात स्थित अमेरिकेच्या विद्यापीठांचे सर्व कर्मचारी, प्राध्यापक आणि विद्यार्थी तसेच त्याच्या आसपासच्या भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना परिसरापासून एक किलोमीटरचे अंतर राखण्याचा सल्ला देत आहोत असे आयआरजीसीने म्हटले आहे. अमेरिकेच्या अनेक विद्यापीठांची केंद्रं आखाती क्षेत्रात फैलावलेली आहेत. यात कतारमधील टेक्सास एअँडएम युनिव्हर्सिटी, संयुक्त अरब अमिरातमधील न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी कॅम्पस सामील आहे.
इराणची विद्यापीठं लक्ष्य
शुक्रवार रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत तेहरान शहरावर हवाई हल्ले झाले, ज्यात राजधानीच्या उत्तर-पूर्व भागात स्थित विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठालाही नुकसान पोहोचले. या हल्ल्यांमुळे इमारतींना नुकसान पोहोचले, परंतु कुठलीच जीवितहानी झालेली नाही.
ओमानमध्ये ड्रोन हल्ले, चौकशी सुरु
ओमानममध्ये अलिकडेच झालेल्या ड्रोन हल्ल्यांप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. आतापर्यंत या ड्रोन हल्ल्यांची जबाबदारी कुणीच स्वीकारलेली नाही असे ओमानच्या विदेश मंत्रालयाने सांगितले आहे. ओमानच्या सलालाह बंदरावर शनिवारी दोन ड्रोन हल्ले झाले, ज्यात एक कर्मचारी जखमी झाल आणि एका क्रेनचे नुकसान झाले. आम्ही आमच्या तटस्थ धोरणावर कायम असून सर्व पक्षकारांना चर्चा सुरू करण्याचे आवाहन करत आहोत असे ओमानने म्हटले आहे.