For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दहावी, बारावी परीक्षा-1 चे अंतिम वेळापत्रक जाहीर

11:30 AM Jan 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
दहावी  बारावी परीक्षा 1 चे अंतिम वेळापत्रक जाहीर
Advertisement

दहावी परीक्षा 21 मार्च ते 4 एप्रिल,बारावी परीक्षा 1 मार्च ते 20 मार्च

Advertisement

बेंगळूर : चालू शैक्षणिक वर्षातील दहावी आणि बारावी वार्षिक परीक्षा-1 चे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. शुक्रवारी यासंबंधी शालेय शिक्षण खात्याने आदेश दिला आहे. त्यानुसार बारावी परीक्षा 1 मार्च ते 20 मार्च या कालावधीत, तसेच दहावी परीक्षा 21 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत होणार आहे. सदर वेळापत्रक सर्व शाळा-महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांनी नोटीस बोर्डवर प्रदर्शित करावे. बारावी परीक्षा-1 चे सर्व पेपर सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत होतील.

दहावी परीक्षा-1 चे वेळापत्रक

Advertisement

  • 21 मार्च (शुक्रवार) : प्रथम भाषा-मराठी, कन्नड, इंग्रजी, हिंदी, तेलगू, तामिळ, उर्दू
  • 24 मार्च (सोमवार) : गणित
  • 26 मार्च (बुधवार) : द्वितीय भाषा-इंग्रजी, कन्नड
  • 29 मार्च (शनिवार) : समाज विज्ञान
  • 2 एप्रिल (बुधवार) : विज्ञान
  • 4 एप्रिल (शुक्रवार) : तृतीय भाषा-हिंदी, कन्नड, इंग्रजी, अरेबिक, पर्शियन, उर्दू, संस्कृत, कोकणी, तुळू.

बारावी परीक्षा-1 चे वेळापत्रक

  • 1 मार्च (शनिवार) : कन्नड, अरेबिक
  • 3 मार्च (सोमवार) : गणित, शिक्षणशास्त्र, तर्कशास्त्र, व्यवहार अध्ययन
  • 4 मार्च (मंगळवार) : मराठी, तेलगू, तमिळ, संस्कृत, मल्याळी, उर्दू, फ्रेंच
  • 5 मार्च (बुधवार) : राज्यशास्त्र, संख्याशास्त्र
  • 7 मार्च (शुक्रवार) : इतिहास, भौतिकशास्त्र
  • 10 मार्च (सोमवार) : ऐच्छिक कन्नड, लेखाशास्त्र, भूगर्भशास्त्र, गृहविज्ञान
  • 12 मार्च (बुधवार) : मानसशास्त्र, रसायनशास्त्र, मूळ गणित
  • 13 मार्च (गुरुवार) : अर्थशास्त्र
  • 15 मार्च (शनिवार) : इंग्रजी
  • 17 मार्च (सोमवार) : भूगोलशास्त्र
  • 18 मार्च (मंगळवार) : जीवशास्त्र, समाजशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, संगणक विज्ञान
  • 19 मार्च (बुधवार) : हिंदुस्थानी संगीत, माहिती तंत्रज्ञान, रिटेल,ऑटोमोबाईल, हेल्थ केअर, ब्युटी अॅण्ड वेलनेस
  • 20 मार्च (गुरुवार) : हिंदी
Advertisement
Tags :

.