For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जीबीएच्या निवडणुकीसाठी अंतिम आरक्षण यादी जाहीर

06:36 AM Mar 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
जीबीएच्या निवडणुकीसाठी अंतिम आरक्षण यादी जाहीर
Advertisement

369 वॉर्डांपैकी 50 टक्के आरक्षण महिलांसाठी राखीव

Advertisement

बेंगळूर :

ग्रेटर बेंगळूर प्राधिकरणाच्या (जीबीए) अंतर्गत येणाऱ्या पाच महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अंतिम आरक्षण यादी जाहीर करण्यात आली आहे. नगरविकास खात्याने ग्रेटर बेंगळूर प्राधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या पाच महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी वॉर्डांची अंतिम आरक्षण यादी प्रकाशित केली आहे.

Advertisement

एकूण 369 वॉर्डांपैकी 50 टक्के आरक्षण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. 185 जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या आहेत. यापूर्वी प्रकाशित झालेल्या आरक्षण यादीवर विविध संघटना, राजकीय पक्ष आणि जनतेने शेकडो हरकती सादर केल्या होत्या. या हरकतींची तपासणी केल्यानंतर, अधिकाऱ्यांनी काही चुका दुऊस्त करून अंतिम आरक्षण यादी तयार केली आहे. महिलांसाठी 50 टक्के आरक्षणाच्या प्रारुप यादीवर आक्षेप होते. अंतिम यादीत या मुद्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून महिलांसाठी पुरेसे आरक्षण देण्यात आले आहे.

याशिवाय, काही भागात पूर्वी निश्चित केलेले आरक्षण बदलण्यात आले आहे. काही वॉर्डांमध्ये तिकीट गमावण्याची शक्मयता असल्याचा आग्रह काही युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी धरल्यानंतर सत्ताधारी पक्षाला फायदा व्हावा म्हणून काही वॉर्डांचे आरक्षण बदलण्यात आल्याची अफवा राजकीय वर्तुळात पसरली आहे.

बेंगळूरजवळील अपघातात तीन तरुण ठार

बेंगळूर : कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. बेंगळूर-कनकपूर मुख्य रस्त्यावरील कागलीपूर येथील आगर क्रॉसजवळ रविवारी पहाटे ही घटना घडली. सय्यद पाशा (वय 22), युनिफ बान (वय 23) आणि अझहर पाशा (वय 22), अशी मृतांची नावे आहेत. फराज नामक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बेंगळूरमधील एका खासगी ऊग्णालयात उपचार सुरू आहेत. कारमधून चार मित्र प्रवास करत होते. त्यावेळी कारने ट्रकला जोराची धडक दिली. या धडकेत कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी पहाटे 3 वाजता हा अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी राजराजेश्वरी ऊग्णालयात पाठवले आहेत. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Advertisement
Tags :

.