विमान अपघात अंतिम अहवाल सहा महिन्यात
06:25 AM Jul 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
Advertisement
गुजरातमध्ये मागील महिन्यात झालेल्या विमान दुर्घटनेची चौकशी विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) करत असून यासंबंधीचा अंतिम अहवाल येण्यास 6 ते 8 महिने लागू शकतात. या अहवालातून अपघाताचे संपूर्ण सत्य समोर येण्याची शक्यता आहे. सध्या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि घटनास्थळावरील काही पुराव्यांद्वारे तपास सुरू आहे. यापूर्वी 8 जुलै 2025 रोजी एएआयबीने 15 पानांचा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालात इंधन पुरवठ्यातील व्यत्ययामुळे म्हणजेच दोन्ही इंजिनचे इंधन स्विच एका सेकंदाच्या फरकाने बंद केल्यामुळे अपघात झाल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु हे इंधन स्विच का आणि कसे बंद करण्यात आले हे अजूनही एक गूढ आहे. आता एएआयबीच्या अंतिम अहवाल हे गूढ उकलेल अशी अपेक्षा आहे.
Advertisement
Advertisement