For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खराब हवामानामुळे अंतिम सामना रद्द

02:46 AM Dec 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
खराब हवामानामुळे अंतिम सामना रद्द
Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

Advertisement

19 वर्षाखालील वयोगटातील तिरंगी वनडे क्रिकेट मालिकेतील रविवारी भारत आणि अफगाण यांच्यातील अंतिम सामना खराब हवामानामुळे रद्द करावा लागला. मुसळधार पाऊस आणि अंधुक प्रकाशामुळे पंचांनी खेळ थांबविण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले.

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 19 षटकात 5 बाद 79 धावा जमविल्या होत्या. कनिष्क चौहान 28 धावांवर खेळत होता. तर कुंडूने 27 धावा केल्या. अफगाणच्या अझिजने 12 धावांत 2 गडी बाद केले. कर्णधार विहान मल्होत्रा आणि वंश आचार्य हे दोन फलंदाज अझिजने लवकर बाद केले. कुंडू आणि चौहान यांनी पाचव्या गड्यासाठी 51 धावांची भागिदारी केली होती. तत्पूर्वी भारताची स्थिती 4 बाद 24 अशी केविलवाणी होती.

Advertisement

संक्षिप्त धावफलक - भारत 19 षटकात 5 बाद 79 (कनिष्क चौहान नाबाद  28, कुंडू 27, अझिज 2-12).

Advertisement
Tags :

.