For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एसजी पायपर्स, श्राची बंगाल टायगर्स यांच्यात आज अंतिम लढत

06:47 AM Jan 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
एसजी पायपर्स  श्राची बंगाल टायगर्स यांच्यात आज अंतिम लढत
Advertisement

वृत्तसंस्था/ रांची

Advertisement

दोन आठवड्यांच्या रोमांचक 12 सामन्यांनंतर एसजी पायपर्स आणि श्राची बंगाल टायगर्स हे संघ आज शनिवारी येथे महिला हॉकी इंडिया लीगच्या अंतिम सामन्यात आमनेसामने येणार आहेत. लीगच्या विजेत्या संघाला 1.5 कोटी ऊपयांचे बक्षीस मिळेल, तर उपविजेत्या संघाला 1 कोटी ऊपये मिळतील. तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या रांची रॉयल्स संघाला 50 लाख ऊपये दिले जातील.

खेळण्याची शैली बऱ्याच प्रमाणात एकसारखी असलेल्या या अंतिम फेरीतील दोन्ही संघांनी अत्यंत स्पर्धात्मक हंगामात आपले वर्चस्व राखलेले आहे. एसजी पायपर्स संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले, तर श्राची बंगाल टायगर्सने दुसरे स्थान निश्चित केले. या दोन्ही अव्वल संघांमध्ये लीग टप्प्यात दोनदा सामना झाला, ज्यात श्राची बंगाल टायगर्सने दोन्ही वेळा पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळवला. पहिल्या सामन्यात 3-3 अशी बरोबरी झाल्यानंतर टायगर्सने शूटआऊटमध्ये 4-3 असा विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात गोलशून्य बरोबरीनंतर त्यांनी शूटआऊटमध्ये 7-6 असा विजय मिळवला.

Advertisement

तथापि, संपूर्ण लीग टप्प्यातील आकडेवारी एसजी पायपर्सच्या बाजूने आहे. या स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्राया संघांमध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत, त्यांनी 11 गोल केले आहेत, जे केवळ रांची रॉयल्सपेक्षा (13 गोल) कमी आहेत. त्यांची कर्णधार नवनीत कौरने आतापर्यंत स्पर्धेत चार गोल करून संघाचे नेतृत्व शानदार पद्धतीने केले आहे.

लोला रिएरा (3 गोल) आणि सुनेलिता टोप्पो (2 गोल) यांनीही योगदान दिले आहे, तर ज्योती सिंग आणि मारिया टेरेसा व्हियानाचे यांनीही गोल केले आहेत. पायपर्सची बचावफळीही लीगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यांनी गट टप्प्यात केवळ नऊ गोल स्वीकारले आहेत. आपल्या संघाच्या प्रवासावर भाष्य करताना, एसजी पायपर्सची कर्णधार नवनीत कौर म्हणाली, हा आमच्यासाठी एक अविश्वसनीय प्रवास राहिला आहे आणि अंतिम फेरीत पोहोचणे हे प्रत्येक खेळाडूने केलेल्या कठोर परिश्रमाचे फलित आहे.

गेल्या हंगामात गुणतालिकेत तळाशी राहण्यापासून ते यावर्षी अव्वल स्थान पटकावण्यापर्यंत केलेले पुनरागमन विशेष आहे. आम्ही या प्रवासात निर्भीड हॉकी खेळलो आहोत आणि आता उच्च कामगिरीसह स्पर्धेचा शेवट करणे हेच आमचे ध्येय आहे, असे कौरने सांगितले. दरम्यान, श्राची बंगाल टायगर्सने आतापर्यंत स्पर्धेत केवळ सात गोल केले आहेत, त्यापैकी पाच गोल पेनल्टी कॉर्नर तज्ञ ऑगस्टिना गोर्झेलानीने केले आहेत. वंदना कटारिया नेतृत्व करत असलेल्या या संघात भरपूर अनुभवी खेळाडू आहेत.

Advertisement
Tags :

.