For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साईराज वॉरियर्स-रोहन ट्रेडर्स यांच्यात अंतिम लढत

10:04 AM Apr 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
साईराज वॉरियर्स रोहन ट्रेडर्स यांच्यात अंतिम लढत
Advertisement

बेळगाव : रोहन ट्रेडर्स बीएससी संघाने सांघिक खेळाच्या जोरावर दुसऱ्या क्वॉलिफायर सामन्यात पोतदार रॉयल्स सीसीआय संघाचा 40 धावांनी पराभव करत सिद्धेश्वर ग्रॅनाईट पुरस्कृत युनियन जिमखाना आयोजित सिद्धेश्वर ग्रॅनाईट चषक बेळगाव टी-20 लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना रोहन ट्रेडर्स बीएससी संघाने 20 षटकात 9 बाद 162 धावा केल्या. रणजीपट्टू सुजय सातेरीने 32 चेंडू 6 चौकारांसह 50 धावा केल्या. त्याला रोहन कदमने 28 चेंडूत 4 चौकार व 2 षटकारसह 38, राहुल नाईकने 2 षटकारांसह 19, अक्षय जुवेकरने 2 चौकार, 1 षटकारासह 18 धावा केल्या. पोतदार रॉयल्स सीसीआयतर्फे अर्जुन पाटीलने 3, आकाश असलकरने 2 तर अमित यादवने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना पोतदार रॉयल्स सीसीआय संघाचा डाव 19.5 षटकात 122 धावांमध्ये आटोपला. रोहन ट्रेडर्स संघाच्या सर्वच गोलंदाजाने किफायतिशीर मारा करत पोतदार रॉयल्सच्या फलंदाजांना जखडून ठेवले. अंगदराज हितलमनी 28, अमित यादव 25, आदर्श रिमोट 17 धावा केल्या. रोहन ट्रेडर्सतर्फे मनीकांत बुकिटगार 3, हर्ष पटेल 2 तर आकाश कटांबळे, अक्षय पाटील्। सौरव सामंत व कृष्णा बागडी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. सामनावीर सुजय सातेरी व इम्पॅक्ट खेळाडू मनीकांत बुकिटगार यांना प्रमुख पाहुणे राकेश कलघटगी, विद्याधर कदम व जयपाल गुंजीकर यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला. अंतिम सामना सोमवार दिनांक 15 रोजी सकाळी 10.30 वाजता खेळविण्यात येणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.