For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘द बीटल्स’ बायोपिकचे चित्रिकरण सुरू

06:31 AM Sep 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘द बीटल्स’ बायोपिकचे चित्रिकरण सुरू
Advertisement

फिल्म स्टार पॉल मेस्कल, जोसेफ क्विन, बैरी कोगन आणि हॅरिस डिकिंसन हे लंडनच्या प्रसिद्ध एबी रोडवर चित्रिकरण करताना दिसून आले आहेत. हे सर्व कलाकार ‘द बीटल्स’चा आयकॉनिक अल्बम कव्हरला रीक्रिएट करताना दिसून आल्याचे मानले जात आहे. हा प्रोजेक्ट प्रसिद्ध दिग्दर्शक सॅम मेंडेस निर्माण करत असून याचे नाव ‘द बीटल्स-ए फॉर-फिल्म सिनेमॅटिक इव्हेंट’ ठेवण्यात आले आहे. बीटल्सची कहाणी केवळ एका चित्रपटात नव्हे तर चार वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये दाखविण्यात येणार आहे. प्रत्येक चित्रपट बँडच्या एका सदस्याच्या नजरेतून त्याची कहाणी दाखविणार आहे. या चारही चित्रपटांमध्ये चारही सदस्यांची भूमिका वेगवेगळे कलाकार साकारत आहेत. पॉल मेस्कल चित्रपटात पॉल मेकार्टनी, जोसेफ क्विन हा जॉर्ज हॅरिसन, बैरी कोगन हा रिंगो स्टार आणि हॅरिस डिकिंसन हा जॉन लेननच्या रुपात दिसून येणार आहे. हे चित्रपट एप्रिल महिन्यात दर आठवड्याला एक अशा स्वरुपात प्रदर्शित होणार आहेत. द बीटल्स आणि त्याच्या परिवारांनी एखाद्या थिएट्रिकल चित्रपटासाठी त्यांच्या जीवनाची कहाणी आणि संगीताच्या वापराला अधिकृत मंजुरी दिली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.