For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्पेशल ऑप्स सीझन 3 चे चित्रिकरण पूर्ण

06:59 AM Dec 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
स्पेशल ऑप्स सीझन 3 चे चित्रिकरण पूर्ण
Advertisement

सैयामी खेर महत्त्वाच्या भूमिकेत

Advertisement

गुणवान अभिनेत्री सैयामी खेर अलिकडेच ‘घूमर’ या चित्रपटात दिसून आली होती. यातील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते. सैयामी लवकरच दिग्दर्शक नीरज पांडे यांची वेबसीरिज ‘स्पेशल ऑप्स’च्या नव्या सीझनमध्ये दिसून येणार आहे. या सीझनचे चित्रिकरण पूर्ण झाले असून यात ती जबरदस्य अॅक्शन करताना दिसून येणार आहे.

या सीझनमध्ये सैयामी एका अंडरकव्हर एजंटची भूमिका साकारत आहे. ही भूमिका साकारण्यासाठी सैयामीने मिक्स मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतले आहे. मला नेहमीच अॅक्शन प्रोजेक्टसाठी चित्रिकरण करणे आवडते. नागार्जुन यांच्यासोबत मी वाइल्ड डॉग या तेलगू चित्रपटात काम केले होते. स्पेशल ऑप्समधील भूमिका माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सैयामीने सांगितले आहे.

Advertisement

स्पेशल ऑप्समध्ये सैयामीने रॉचे प्रमुख म्हणून भूमिका साकारणाऱ्या के.के. मेनन यांच्य टीमची सदस्य जूही कश्यपची भूमिका साकारली आहे. या सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये प्रत्यक्षात प्रीक्वेलची कहाणी होती, ज्यात सैयामी दिसून आली नव्हती. परंतु आता स्पेशल ऑप्सच्या तिसऱ्या सीझनमध्ये ती पुनरागमन करणार आहे.

Advertisement
Tags :

.