‘असुर 3’मध्ये संदीपा धर वेबसीरिजचे चित्रिकरण सुरू
वेबसीरिज ‘असुर सीझन 3’मध्ये यावेळी अभिनेत्री संदीपा धर दिसून येणार आहे. संदीपाने चित्रिकरणाशी निगडित काही छायाचित्रे शेअर केली आहेत. यातील एका छायाचित्रात ती स्वत:चे डायलॉग वाचताना दिसून येत आहे. तर अन्य छायाचित्रात मेकओव्हर करवून घेताना दिसून येते.
‘हे जबरदस्त असणार आहे, नवी सुरुवात आणि वादळापूर्वीची शांतता’ अशी कॅप्शन संदीपाने या छायाचित्रांना दिली आहे. असुर सीझन 3 मध्ये संदीपा कोणती भूमिका साकारणार हे मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. संदीपासाठी असुर सीरिज मोठी संधी ठरणार आहे.
ओटीटीवरील लोकप्रिय सीरिज ‘असुर’च्या तिसऱ्या सीझनचे चित्रिकरण सुरू झाले आहे. सीरिजच्या मुख्य कलाकारांमध्ये अरशद वारसी आणि वरुण सोबती सामील आहेत. तर सीरिजमध्ये श्वेता बासु प्रसाद आणि अहसास चन्ना देखील मुख्य भूमिकांमध्ये दिसून येऊ शकतात. ही सीरिज पौराणिक कथा, मानसशास्त्र आणि गुन्ह्यांच्या तपासाच्या अनोख्या मिश्रणासाठी ओळखली जाते.