For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मिर्झापूर-द फिल्म’चे चित्रिकरण पूर्ण : श्रिया

06:06 AM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
मिर्झापूर द फिल्म’चे चित्रिकरण पूर्ण   श्रिया
Advertisement

अली फजल अन् पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत

Advertisement

अभिनेत्री श्रिया पिळगावकर ही ‘मिर्झापूर : द फिल्म’मध्ये स्वीटी गुप्ताची भूमिका साकारत आहे. श्रियाने आता सहकलाकार आणि निर्मिती टीमसोबतची अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केली आहेत. याचबरोबर श्रियाने चित्रपटातील स्वत:च्या वाट्याचे चित्रिकरण पूर्ण झाल्याचे सांगितले आहे.

श्रियाने शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये आणि व्हिडिओत अली फजल, श्वेता त्रिपाठी आणि हर्षिता गौरसमवेत अनेक जण दिसून येत आहेत. ‘सेटवर या गँगसोबत नेहमीच सर्वात चांगला वेळ जात असतो. या टीमसोबत पुन्हा भेटणे आणि स्वीटी गुप्ताची भूमिका पुन्हा जगणे अत्यंत खास वाटले’ असे श्रियाने स्वत:च्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

Advertisement

प्राइम व्हिडिओची क्राइम थ्रिलर सीरिजचे हे चित्रपट रुपांतरण असून तो उत्तर भारतात सत्तेची गतिशीलता आणि गुन्हेगारी अंडरवर्ल्ड दर्शवितो. हा चित्रपट चालू वर्षात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी हे कालीन भैयाच्या रुपात, अली फजल हा गु•g पंडित म्हणून तर दिव्येंद्र शर्मा हा मुन्ना त्रिपाठीच्या भूमिकेत दिसून येणार आहे. अभिषेक बॅनर्जी हा कंपाउंडर म्हणून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Advertisement
Tags :

.