For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘गुटर गु सीझन 2’चे चित्रिकरण सुरू

07:00 AM Jan 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘गुटर गु सीझन 2’चे चित्रिकरण सुरू
Advertisement

आश्लेषा ठाकूर मुख्य भूमिकेत

Advertisement

गुटर गु या सीरिजच्या दुसऱ्या सीझनचे चित्रिकरण सुरू झाले आहे. साकिब पंडोरच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या या सीरिजची निर्मिती गुनात मोंगा यांच्या सिख्या एंटरटेनमेंटच्या बॅनर अंतर्गत करण्यात येत आहे. सीरिजमध्ये विशेष बंसल आणि आश्लेषा ठाकूर मुख्य भूमिकेत आहेत. दोघेही अनुज आणि ऋतू या व्यक्तिरेखा साकारत आहेत. आश्लेषाला द फॅमिली मॅन या सीरिजमुळे मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. ही सीरिज उमलत्या वयातील प्रेमकहाणीवर आधारित आहे. पहिला सीझन समीक्षकांसोबत प्रेक्षकांना आवडला होता. ही अमेझॉन मिनी टीव्हीवर सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या सीरिजपैकी एक ठरली आहे. दुसऱ्या सीझनमध्ये नव्या आव्हानांदरम्यान, जीवन, करियर आणि परस्परांकडून असणाऱ्या अपेक्षांदरम्यान दोघांचाही प्रवास दाखविला जाणार आहे. गुटर गु या सीरिजची कहाणी आमच्या मनाला भिडणारी आहे. ऋतू आणि अनुजच्या कहाणीला प्रेम मिळाल्यावर आम्ही ती आणखी पुढे नेण्याचा विचार केला. आम्ही सीरिजद्वारे लोकांना जुन्या आठवणींमध्ये रममाण करण्यावरून अधिक उत्साही आहोत, असे मोंगा यांनी म्हटले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.