For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

‘फॅमिली स्टार’ चे चित्रिकरण पूर्ण

06:02 AM Mar 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘फॅमिली स्टार’ चे चित्रिकरण पूर्ण

विजय देवरकोंडा-मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत

Advertisement

दक्षिणेचा सुपरस्टार विजय देवरकोंडा सध्या ‘फॅमिली स्टार’ या स्वत:च्या आगामी चित्रपटावरून चर्चेत आहे. चित्रपटात त्याच्यासोबत मृणाल ठाकूर दिसून येणार आहे. परशूराम पेटला यांच्याकडून दिग्दर्शित या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले आहे. आता या चित्रपटाच्या निर्मित्तीनंतरचे काम सुरू आहे. Filming of 'Family Star' is complete

हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. विजयने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत याची माहिती दिली आहे. या व्हिडिओत परशुराम पेटला, मृणाल आणि विजय दिसून येत आहे. हा चित्रपट 5 एप्रिल रोजी झळकणार असल्याची माहिती विजयने दिली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच सादर केला जाणार आहे. 2018 मधील ब्लॉकबस्टर चित्रपट ‘गीता गोविंदम’नंतर विजय आणि दिग्दर्शक परशुराम पेटला यांची जोडी ‘फॅमिली स्टार’च्या निमित्ताने पुन्हा एकत्र आली आहे.  या चित्रपटात विजय, मृणालसोबत दिव्यांश कौशिक, अजय घोष तसेच आणखी अनेक कलाकार दिसून येणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती वेंकटेश्वर क्रिएशन्सच्या बॅनर अंतर्गत दिल राजू यांच्याकडून करण्यात आली आहे. तर गोपी सुंदर यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
×

.