For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चित्रपट निर्माता सौंदर्य जगदीश यांची आत्महत्या

06:17 AM Apr 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
चित्रपट निर्माता सौंदर्य जगदीश यांची आत्महत्या
Advertisement

बेंगळूर : कन्नड चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध निर्माता सौंदर्य जगदीश यांनी रविवारी सकाळी महालक्ष्मी लेआउटमध्ये आत्महत्या केली आहे. आर्थिक कारणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. राजाजीनगरच्या सुगुण रुग्णालयात मृतदेह  ठेवण्यात आला आहे. सौंदर्य जगदीश यांनी गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला असता त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने स्थानिक सुगुण ऊग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांनी अप्पू-पप्पू, स्नेहितरू यांसारख्या अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती. बेंगळूरमधील जेटलॉग पबचे मालक असलेले जगदीश बिल्डरही होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.