कोल्हापूर सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याच्या अंगावर भिरकाविली फाईल
कोल्हापूर :
माझ्या वाहनाच्या कागदपत्रावर हरकत का घेतला, माझ्या वाहनाचे पेपर आताच्या आता मजूर करा, असे म्हणत एका तऊणाने शहरातील प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयातील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये बेकायदेशिरपणे प्रवेश कऊन, वाहनाचे पेपर मजुर न केल्यास बघून घेण्याची धमकी दिली. त्यांच्या अंगावर टेबलावरील रजिस्टर फेकून मारल्याची घटना गुऊवारी दुपारी घडली आहे. या प्रकरणी शाहूपूरी पोलिसात अमित उर्फ प्रशांत रामदास भोसले (रा. डी वॉर्ड, जवाहरनगर, कोल्हापूर) या तऊणाविरोधी गुन्हा दाखल झाला आहे.
संशयित अमित उर्फ प्रशांत भोसले याने प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयातील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन कमलाकर सावदेकर यांच्या कार्यालयामध्ये बेकायदेशिरपणे प्रवेश केला. कार्यालयातील कनिष्ठ लिपीक उमेश गिते याने माझ्या वाहनाच्या पेपरवर हरकत का घेतली आहे. माझ्या वाहनाचे पेपर आताच्या आता मजूर करा, असे म्हणत त्यांच्यावर दबाव टाकून, तुम्ही माझे काम विनाकारण विलंब करत आहात. मला वाहनाचे पेपर आज मजूर कऊन पाहिजे. नाही तर मी तुम्हाला पाहून घेईन. तुमची तक्रार देईन, अशी धमकी देऊन, त्याने त्यांच्याशी उद्धटपणे बोलत, माझे काम नाही झाले. तर तुम्हाला बघून घेतो, अशी धमकी दिली. तसेच त्याने सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन सावदेकर यांच्या अंगावर त्यांच्याच टेबलावरील कागदाची फाईल फेकून मारली. या घडल्या प्रकाराने प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयात एकच गोंधळ उडाला होता. याबाबत सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन सावदेकर शाहूपूरी पोलिसात धाव घेतली. संशयीत अमित उर्फ प्रशांत भोसले याच्याविरोधी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी याची गाभीर्याने दखल घेऊन, संशयीत भोसले याच्याविरोधी सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी अधिकाऱ्याला धमकी देणे, त्यांना फाईलने मारहाण करणे. अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.