साळगावकरांवर हल्ल्याचा कट रचणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा !
माजी नगरसेवकांचे पो. निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांना निवेदन
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी ते आंबोली रस्ता दुरुस्ती व नुतनीकरण या कामाबाबत झालेल्या भष्ट्रचारा विरोधात तक्रार करुन संबंधित कामाच्या चौकशीची मागणी करण्यात आल्यानंतर संबंधित भ्रष्टाचारात गुंतलेल्या ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून प्राणघातक हल्ल्याचा कट रचण्यात आला याची चौकशी करण्याची मागणी माजी नगरसेवक व नागरिकांनी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्याकडे केली . सावंतवाडी ते आंबोली घाटमार्ग रस्ता दुरुस्ती व नुतनीकरण या कामाबाबत झालेल्या भ्रष्टाचाराविरोधी तक्रार करुन त्यासंदर्भात चौकशीची मागणी करण्यात आल्यानंतर संबंधित भ्रष्टाचारात गुंतलेल्या ठेकेदार व सार्व. बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून प्राणघातक हल्ला तसेच दुखापत करण्याबाबतचा कट एकत्रित जमून रचण्यात आला.
सावंतवाडी एका ठेकेदाराच्या प्लांटवर सुमारे १० दिवसांपूर्वी हा कट शिजविण्यात आला. माजी नगराध्यक्ष बबनराव साळगावकर यांच्यावर हल्ला करण्याबाबतचा प्लॅन ह्यावेळी रचण्यात आला . त्यावेळी झालेल्या चर्चेमध्ये काही ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी कार्यालयाचा एक अधिकारी यांनी हा प्राणघातक हल्ला करण्याचा प्लान तयार केला. याबाबत आपण सखोल चौकशी करून संबंधित हल्लेखोरांना जनतेच्या समोर आणावे, तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी माजी नगरसेवक उमाकांत वारंग , विलास जाधव , सुरेश भोगटे , उमेश कोरगावकर , तसेच सुंदर गावडे , दीपक सावंत , बावतीस फर्नांडिस , सुधीर पराडकर, उपस्थित होते. संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांची नावे यावेळी देण्यात आली.