विषबाधाप्रकरणी संशयितांवर गुन्हा नोंद करा
कसबा बीड :
करवीर तालुक्यातील मौजे मांडरे इथं अन्नातून विषबाधा होवून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी गंगा कृष्णात पाटील आणि तिची आई जया युवराज दाभाडे यांच्यावर गुन्हे नोंद करावेत अशी मागणी मौंजे मांडरे ग्रामस्थांना केलीय. या मागणीच निवेदन जिल्हाधिकारी, तहसिलदार, व करवीर पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांना देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, करवीर तालुक्यातील मांडरे तेथील पाटील कुटुंबातील चार जणांना 15 नोव्हेंबर रोजी अन्नातून विषबाधा झाली होती. यामध्ये पांडुरंग पाटील, त्यांचा मुलगा कृष्णात पाटील, रोहित पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर प्रदीप पाटील यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे.
या प्रकरणी ग्रामस्थांनी गंगा पाटील आणि तिची आई जया दाभाडे यांच्यावर संशय व्यक्त केला होता. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाईची मागणी करण्यात आली होती. मात्र करवीर पोलिसांकडून अद्यापही संशयतांवर कारवाई झालेली नाही. या बाबत मांडरे गावचे सरपंच कृष्णात सुतार,उपसरपंच - भरत किरूळकर यांच्यासह ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने आज पोलिस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षकांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचे प्रतिनिधी म्हणून करवीरचे पोलिस निरिक्षक किशोर शिंदे यांची भेट घेवून मयत कृष्णात पाटील यांची पत्नी गंगा पाटील आणि तिची आई जया दाभाडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.
मृतांचे फॉरेन्सीक लॅबचे रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई होईल अस उपनिरिक्षक किरण कागलकर यांनी शिष्टमंडळाला सांगितल .त्यानंतर शिष्टमंडळानं करवीरचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांची भेट घेवून संशयीतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शिष्टमंडळात पंढरी पाटील, छाया रोटे, संपदा पाटील, वंदना कांबळे या ग्रामपंचायत सदस्यांसह 50 हून अधिक ग्रामस्थ आणि महिलांचा समावेश होता. यामध्ये विशेष महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.