For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘फायटर’ 25 रोजी झळकणार

06:50 AM Jan 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘फायटर’ 25 रोजी झळकणार
Advertisement

ऋतिक रोशन आणि  दीपिका पदूकोन यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘फायटर’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. 3 मिनिटांच्या याच्या ट्रेलरमध्ये अनेक दमदार एरियल अॅक्शनसीन्स दिसून येतात. याचबरोबर मैत्री आणि देशभक्तीची झलक दिसून येते. चित्रपटाची कहाणी देशावर झालेल्या एका दहशतवादी हल्ल्याशी सबंधित असून याचा सूड फायटर्स घेत असल्याचे दाखविण्यात आले आहे. चित्रपटात काही लक्ष वेधून घेणारे संवाद आहेत.

Advertisement

यात ‘फायटर वो नहीं हे जो अपने टारगेट अचीव करता है, फायटर वो है जो उन्हें ठोक देता है’चा समावेश आहे. ‘पीओके का मतलब होता है पाकिस्तान ऑक्यूपाइड काश्मीर, तुमचे ऑक्यूपाई किया है पर मालिक हम है’ असाही संवाद यात असून तो प्रेक्षकांची मने जिंकणारा ठरणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ऋतिक आणि दीपिकासोबत अनिल कपूरची व्यक्तिरेखा दिसून येत आहे. अनिल कपूर यांनी यात ग्रूप कॅप्टन राकेश रॉकी सिंह ही भूमिका साकारली आहे. तर ऋतिक यात स्क्वाड्रन लीडर शमशेर पॅटी आणि दीपिका स्क्वाड्रन लीडर मीनल राठौड ही भूमिका साकारत आहे. या चित्रपटाद्वारे ऋतिक आणि दीपिका ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. याचबरोबर फायटर चित्रपटात करण सिंह ग्रोवर, संजीदा शेख आणि अक्षय ओबेरॉय हे कलाकारही दिसून येणार आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.