For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara news | नारीशक्ती वंदन विधेयकावरून साताऱ्यात रणकंदन; भाजप महिला मोर्चाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश!

01:03 PM Apr 26, 2026 IST | NEETA POTDAR
satara news   नारीशक्ती वंदन विधेयकावरून साताऱ्यात रणकंदन  भाजप महिला मोर्चाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश
Advertisement

                           साताऱ्यात महिला मोर्चाचा आक्रोश!

Advertisement

सातारा - संसदेत मांडण्यात आलेले नारीशक्ती वंदन (महिला आरक्षण) विधेयक मंजूर न झाल्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात भाजप महिला मोर्चा आक्रमक झाला आहे. विरोधकांनी महिलांच्या सन्मानाला विरोध केला, असा आरोप करत भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या वतीने जनआक्रोश पदयात्रेचे आयोजन करण्यात आले.

ही पदयात्रा सायोमली-शिवतीर्थ, पोवई नाका येथून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली. मोठ्या संख्येने महिला व कार्यकर्त्यांचा सहभाग यावेळी पाहायला मिळाला.

Advertisement

यावेळी बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. समाजवादी पक्ष व त्यांच्या सहयोगींनी राजकीय स्वार्थातून या विधेयकाला विरोध केला, असा आरोप त्यांनी केला. महिला आरक्षणामुळे महिलांना योग्य प्रतिनिधित्व मिळणार होते, मात्र विरोधकांनी केवळ राजकारणासाठी अडथळे निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच, लोकसंख्या वाढ, जनगणना आणि डिलिमिटेशन या मुद्द्यांवरही विरोधक दिशाभूल करत असल्याचे भोसले यांनी स्पष्ट केले. अधिक लोकप्रतिनिधी निवडून येणे म्हणजे अधिक लोकांना संधी मिळणे, आणि त्यात महिलांनाही योग्य वाटा मिळावा, हीच भाजपची भूमिका असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

भोसले पुढे म्हणाले की, भारतीय जनता पार्टी च्या वतीने काँग्रेससह महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व पक्षांचा सातारा जिल्ह्यातील महिलांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेला जिल्ह्यातील महिलांचा पूर्ण पाठिंबा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सातारा जिल्ह्यातील राजकारणात झालेला बदल दाखवत, आगामी निवडणुकांमध्ये महिलांची शक्ती विरोधकांना उत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Advertisement
Tags :

.