जागेच्या वादातून ढोराळेत मारामारी
विटा :
जागेच्या वादातून खानापूर तालुक्यातील ढोराळे येथे जोरदार मारामारी झाली. याप्रकरणी राजाराम सोपान बोडरे ( वय 53, ढोराळे, ता. खानापूर ) यांनी सोळा जणांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
ज्ञानदेव पांडुरंग गुजले, प्रकाश ज्ञानदेव गुजले, संजय सदाशिव गुजले,विठ्ठल सदाशिव गुजले, अशोक सदाशिव गुजले, गजानन भिमराव गुजले, विकास भिमराव गुजले, भिमराव पांडुरंग गुजले, अविनाश ज्ञानदेव पवार ( सर्व ऐनवाडी, ता. खानापूर ), मंदाबाई भिमराव गुजले, जयश्री विठ्ठल गुजले, मेधा गजानन गुजले, द्रोपदा ज्ञानदेव गुजले, सुरेखा चव्हाण ( पुर्ण नांव माहित नाही ), वैशाली वसंत गुजले, शीतल अशोक गुजले ( सर्व ढोराळे, ता. खानापूर ) अशी संशयितांची नावे आहेत. तर राजाराम सोपान बोडरे, कुसुम राजाराम बोडरे, दीपक राजाराम बोडरे, सुनीता अर्जुन बोडरे, अर्जुन बोडरे,
सुदान बोडरे ( सर्व ढोराळे, ता. खानापूर ) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास जोतिबा आणि माऊतीच्या मंदीराजवळ झाली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, राजाराम बोडरे यांच्या गट नंबर 483 मधील जागेत बोडरे यांना ज्ञानदेव गुजले, प्रकाश गुजले, संजय गुजले, विठ्ठल गुजले, अशोक गुजले, गजानन गुजले, विकास गुजले व भिमराव गुजले यांनी अडवून धरले. त्यांचा मोबाईल काढून घेतला. कळकाच्या काठीने बोडरे यांना मारहाण करू लागले. त्यावेळी अविनाश पवार हा बोडरे यांच्या डोक्यात दगड घालण्याकरिता धावून आला. तसेच अविनाश पवार, मंदाबाई गुजले, जयश्री गुजले, मेधा गुजले, द्रोपदा गुजले, सुरेखा चव्हाण, वैशाली गुजले व शीतल गुजले यांनी मिळून बोडरे यांची पत्नी कुसुम, मुलगा दीपक, वहिनी सुनीता बोडरे व बोडरे यांचे भाऊ अर्जुन व सुदान यांना जोतिबा व मारूतीच्या मदिराजवळ मारहाण केली. भांडणाचा व्हीडीओ करीत असताना बोडरे यांचे दोन मोबाईल संशयितांनी काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.