खुपीरेमध्ये दोन कुटुंबात मारामारी; दोघे जखमी
कोल्हापूर :
बांधकामाची खडी व वाळू काढून घेण्याच्या कारणावऊन खुपीरे (ता. करवीर) येथील शाहू कॉलनीत दोन कुटूंबात मारामारी झाली. या मारामारीत अशोक लक्ष्मण कोठावळे (वय 65), रेश्मा शिवाजी कोठावळे (वय 35) हे दोघे जखमी झाले आहे. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात दोन्ही कुटूंबातील पाच जणाविरोधी गुन्हा दाखल झाला असून, याची परस्पर विरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत.
जखमी रेश्मा कोठावळे यांनी गेल्या काही महिन्यापूर्वी घराचे बांधकाम सुऊ केले आहे. बांधकामासाठी लागणारी खडी आणि वाळू बांधकाम सुऊ असलेल्या जागेनजीक टाकली आहे. या टाकलेल्या खडी, वाळूमुळे शेजारचे अशोक कोठावळेच्या कुटुंबाला घरात जाणे-येण्यास अडचण येत होती. त्यामुळे त्यांनी खडी, वाळू काढून घेण्याविषयी रेश्मा कोठावळे हिच्या कुटुंबाला सांगितले होते. तरीसुध्दा त्यांनी टाकलेली खडी, वाळू आपल्याच मालकीच्या जागेवर टाकली असल्याचे सांगून, काढून घेतण्यास नकार दिला. याच कारणावऊन या दोन कुटुंबात शाब्दीक वादावादी होऊन मारामारी झाली. यामध्ये दोघे जखमी झाले. याबाबत रेश्मा कोठावळे हिने अशोक लक्ष्मण कोठावळे, त्याचा मुलगा संभाजी कोठावळे, सून विद्या संभाजी कोठावळे या तिघाविरोधी फिर्याद दाखल केली. तर अशोक कोठावळे यांनी रेश्मा कोठावळे, तिचा पती शिवाजी अशोक कोठावळे या दोघाविरोधी फिर्याद दिली आहे.