For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Crime: चिखलगोठण येथील दोन कुटुंबात मारामारी, 2 जखमी

06:52 PM Feb 03, 2026 IST | NEETA POTDAR
sangli crime  चिखलगोठण येथील दोन कुटुंबात मारामारी  2 जखमी
Advertisement

                         चिखलगोठण मारामारी प्रकरणात सात जणांविरोधात गुन्हा

Advertisement

तासगाव : तासगांव तालुक्यातील चिखलगोठण येथे झालेली भांडणे मिटवण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात झालेल्या मारामारीत दोघे जण जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही कुटुंबातील सातजणा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी उज्वला हणमंत पवार रा. चिखलगौठण यांनी हणमंत हरीभाऊ पवार रा. चिखलगोठण, दगड्डु विठोबा काळे, प्रथमेश दगडु काळे, दोघे रा.चिंचणी यांच्या विरूध्द फिर्याद दिली आहे.

यामध्ये म्हटले आहे की, माझे सासर व माहेर हे चिखलगोठण आहे. पती हणमंत पवार यांना यांना दारूचे व्यसन आहे. या कारणावरून माझेत व पती यांचेतघरगुती कारणावरून वाद होत होते. यावरूनच पती व वडील यांचेत ही अधुन मधून वाद होत होते.वडीलांचे घरी चिखलगोठण गावी पतीचे मामा दगड्डु काळे व त्यांचा मुलगा प्रथमेश काळे दोघे रा. चिंचणी हे दोघे जण माझेत व पती यांचेत होणारी भांडणे मिटवण्यासाठी आलेले होते. त्यावेळी मी व पती दोघे ही वडीलांचे घरी गेलो होतो. त्यावेळी दगडू काळे व प्रथमेश काळे या दोघांनी वडील अशोक सुर्यवंशी यांना सदरची भांडणे मिटवून टाकुया असे म्हणत असताना वडीलांनी तुमची भांडणे तुमची तुम्ही मिटवा जावा असे म्हणाले.त्यावेळी दगडू काळे व प्रथमेश काळे यांनी वडीलांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनीमारहाण करण्यास सुरूवात केली.

Advertisement

तर पती हणमंत पवार यांनी देखील वडीलांना तेथेच पडलेली कळकाची काठी हातात घेवुन वडीलांच्या डोक्यात मारून जखमी केले. तर दगडु काळे यांनी दगड हातात घेवुन वडीलांच्या डोक्यात मारून जखमी केले. तसेच प्रथमेश काळे यांने वडीलांना लाथाबकुक्यांनी मारहाण करून तुम्हाला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली.याप्रकरणी दगडू विठोबा काळे रा. चिंचणी, ता. तासगांव यांनी अशोक उमाजी सुर्यवंशी रा. चिखलगोठण अश्विनी सुरज थोरबोले रा. तासगांव, राणी प्रकाश पाटील, रा. राजापूर व उज्वला हणमंत पवार रा. चिखलगोठण यांच्या विरूध्द फिर्याद दिली आहे. यामध्ये म्हंटलेआहे की, माझा भाचा हणमंत हरीभाऊ पवार हे चिखलगोठण येथे त्यांचे कुटुंबासह राहण्यास आहेत. त्यांचेकडे मी अधुन मधून जात येत असतो.

मी व शानुर दानवडे रा. कुपवाड ता. मिरज जि. सांगली असे दोघेजण चिखलगोठण गावी भाचा हणमंत पवार व त्यांची पत्नी उज्वला पवार यांचेत झाले भांडण मिटवण्याकरिता गेलो होतो. हणमंत पवार यांचे सासरे अशोक सुर्यवंशी यांचे घराचे समोर पोहचलो असता हणमंत पवार व त्यांची पत्नी उज्वला पवार ही समजावून सांगत होतो.त्यावेळी हणमंत पवार यांचे सासरे अशोक सुर्यवंशी यांनी मला तुझा येथे काय संबंधआहे असे म्हणून शिवीगाळ केली. व तेथे पडलेला दगड उचलून मला डोकीत मारला. त्यानंतर अशोक यांनी कोयता हातात घेवुन माझे अंगावर धावून आल्यावर झटापटीत माझे उजवे हाताचे पोटरीवर खरचटला आहे.

तेथे उभ्या असलेल्या अश्विनी थोरबोले, राणी पाटील, उज्वला पवार, यांनी तेथे पडलेल्या दांडक्याने माझे डावे हातावर मारहाण केली. त्यानंतर माजे बाजूला उभा असलेला माझा भाचा हणमंत हरीभाऊ पवार हा सोडवण्यास मध्ये आला असता त्यास देखील अश्विनी थोरबोले, राणी पाटील, उज्वला पवार यांनी शिवीगाळी करून लाथाबुक्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

Advertisement
Tags :

.