राजस्थानमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची लढत; विविध एक्झिट पोल बाहेर
भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेस यांच्यात राजस्थानमध्ये निकराची लढत होण्याची शक्यता असून इंडिया टुडे- अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोल आज जाहीर झाला. त्यामध्ये १९९ सदस्यसंख्या असलेल्या राजस्थान विधानसभांमध्ये काँग्रेसला १०६ जागा तर भाजपला ८० ते १०० जागा मिळू शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
राजस्थान कोणत्याही पक्षात पदरात पडू शकतो किंवा त्याठिकाणी त्रिशंकू विधानसभा होऊ शकते. या सर्व एक्झिट पोलची सरासरी काढता काँग्रेस 96, भाजप 90 आणि इतर 13 जागांवर आहेत.
या अंदाजानुसार, राजस्थानमध्ये काँग्रेसला 42 टक्के मते मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे, तर भाजप 41 टक्क्यावर आहे.
याशिवाय, राजस्थानमध्ये बहुजन समाज पक्षाला (BSP) 2 टक्के मते तर इतर अपक्ष उमेदवारांना 15 टक्के मते मिळतील. असे एक्झिट पोलमध्ये दिसून आले आहे.
राजस्थानमधील सर्वात मोठी विधानसभा जागा असलेल्या जयपूरमध्ये भाजपला ४२ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे, तर काँग्रेस त्या ठिकाणी ४५ टक्क्यांवर आहे. जयपूरमध्येच बहुजन समाज पक्षाला (बसपा) २ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबरला मतदान झाले आणि विधानसभा निवडणुकीचे निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार आहेत.