कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Kolhapur News: 85 लाखांच्या घोटाळ्यातील पाचवी प्रत संशयास्पद, खोट्या सहीचा दावा

06:34 PM Jul 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ठेकेदाराने खोट्या सह्या केल्याचे लिहून दिले आहे.

Advertisement

कोल्हापूर : महापालिकेच्या 85 लाख रुपयांच्या ड्रेनेज घोटाळ्यातील कामाच्या पहिल्या चार एमबी (मोजमाप पुस्तक) या हस्तलिखित आहेत. तर पाचवी एमबी कॉम्प्युटरवर टाईप केली आहे. दरम्यान, एमबीवर सह्या आमच्या नाहीत असा खुलासा तत्कालीन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह नोटीसाप्राप्त अधिकाऱ्यांनी केला आहे. महापालिकेच्या विभागीय कार्यालयासह ऑडिट विभागातील कोण यामध्ये सहभागी आहे का? याची सखोल चौकशी सुरू आहे.

Advertisement

कसबा बावड्यात दोन कोटी 43 लाख रुपये खर्चून ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम करण्यात आले होते. संबंधित ठेकेदार प्रसाद वराळे याने काम न करताच 85 लाख रुपये महापालिकेकडून घेतल्याचे माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी पुराव्यासह पुढे आणले होते. यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिकेने चौकशीचे आदेश दिले. दरम्यान, ठेकेदाराने काम न करताच रक्कम उचलल्याची लेखी कबुली महापालिकेला दिली.

महापालिकेने 85 लाखांचे बिल देण्याची शिफारस करणाऱ्या एमबीवर स्वाक्षऱ्या असणारे तत्कालीन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता रमेश कांबळे आणि कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड यांना खुलासा करण्याची नोटीस बजावली. या अधिकाऱ्यांनी आपण सह्या केलेल्या नाहीत. यावरील सह्या खोट्या असल्याचे लेखी लिहून दिले आहे.

अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळ यांनी याप्रकरणी कागदपत्राची तपासणी केली. यातील पहिल्या चार टप्प्यातील कामाचे बिल ठेकेदाराने हाताने लिहलेल्या एमबीवर महापालिकेने अदा केले आहे. मात्र पाचवी एमबी कॉम्प्युटरवर प्रिंट केलेली आहे.

मोठ्या विशेष प्रकल्पांच्या एमबी फक्त कॉम्प्युटर प्रिंट असतात. बाकीच्या सर्व एमबी या हाताने लिहलेल्या असतात. या कामातील फक्त एकच एमबी कॉम्प्युटर प्रिंट असूनही ऑडीट विभागाला याची शंका कशी आली नाही ? याबाबत महापालिका प्रशासन आता उलटतपाणी करत आहे.

ठेकेदाराने खोट्या सह्या केल्याचे लिहून दिले आहे. मात्र ऑडिट करणाऱ्या यंत्रणेलाही कागदपत्राबाबत कसे समजले नाही. हे कोडे सोडवण्याची गरज आहे. संबंधित ठेकेदाराने कसबा बावडा परिसरात किमान 20 ते 25 कोटी रुपयांची कामे केली आहेत. यातील बहुतांश कामे अपूर्ण आहेत. यातील या सर्वच कामाची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे याकामांवर देखरेख करुन पूर्ण झाल्याचा दाखला दिलेले सर्वच अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात येऊ शकतात.

कार्यालयीन नियम धाब्यावर

महापालिकेतील कागद बाहेरील व्यक्तीच्या हातात गेलाच कसा ? कार्यालयीन फाईल ही संबंधित यंत्रणेच्या हातातूनच गेली पाहिजे असा दंडक आहे. मात्र ही एमबी खासगी व्यक्तीमार्फत एका टेबलवरुन दुसऱ्या टेबलवर गेली का? खोट्या सह्या केल्या तर याबाबत कोणालाही शंका का आली नाही? काम पूर्ण झाल्याची पडताळणी कोणी केली? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने आता पुढे आले आहेत.

एसओपी तयार करणार

"महापालिकेची फसवणूक झाली असल्याचे स्पष्ट आहे. ठेकेदाराने अजून कोणाच्या बोगस सह्या केल्या आहेत का याची पडताळणी सुरू आहे. यामध्ये दोषींवर कायदेशीर कारवाई तपासाअंती केली जाणार आहे. आतील किंवा बाहेरील कोणीही यामध्ये सहभागी असला तरी तो यातून सुटणार नाही. केलेल्या स्वाक्षऱ्या, कागदपत्रासह ठेकेदाराने केलेल्या इतर कामाची पडताळणी केली जाईल. असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी एक नियमावली करुन एसओपी केला जाईल. जेणे करुन भविष्यात अशी फसवणूक होणार नाही."

- रविकांत आडसूळ अतिरिक्त आयुक्त, मनपा

Advertisement
Tags :
@KOLHAPUR_NEWS#CONTRACTORE#kasaba bawada#kolhapur News#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaAuditKolhapur Mahanagarpalika
Next Article