For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सोहम नाईक याच्याविरुद्ध पाचवे आरोपपत्र दाखल

04:22 PM Jun 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
सोहम नाईक याच्याविरुद्ध पाचवे आरोपपत्र दाखल
Advertisement

पणजी : कुडचडेतील लैंगिक अत्याचारप्रकरणी गोवा क्राईम ब्रँचने संशयित सोहम नाईक याच्याविऊद्ध पणजी येथील गोवा बाल न्यायालयात पाचवे आरोपपत्र दाखल केले आहे. याप्रकरणात एकूण 27 साक्षीदार असून, 176 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक महेश गडेकर यांनी याप्रकरणाचा तपास करून आरोपपत्र दाखल केले आहे. आतापर्यंत पुढे आलेल्या पाचही प्रकरणात संशयित सोहम नाईक याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. कुडचडे लैंगिक अत्याचारप्रकरणातील सोहम नाईक याच्या विरोधात पाच गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील चार गुन्हे पीडितांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आले आहेत. त्यानुसार दोन गुन्हे कुडचडे पोलिसांनी दाखल करून गुन्हा शाखेकडे वर्ग केले. यातील एका पीडितेवर 14 वर्षांची असताना लैंगिक अत्याचार झाला होता. दुसऱ्या पीडितेला लैंगिक छळ करून धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी पोलीस निरीक्षक महेश गडेकर यांनी तपास पूर्ण करून केपे प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. याप्रकरणातील संशयित सोहम नाईक सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.