For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

4 आरोपींच्या कोठडीत पंधरा दिवसांची वाढ

07:00 AM Dec 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
4 आरोपींच्या कोठडीत पंधरा दिवसांची वाढ
Advertisement

संसद घुसखोरी प्रकरण : खरा हेतू शोधणे आवश्यक असल्याचा पोलिसांचा युक्तिवाद

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

संसदेतील सुरक्षा भेदून घुसखोरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींच्या कोठडीत 15 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. आम्हाला काही महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. आरोपी नीलम, मनोरंजन डी, सागर शर्मा आणि अमोल शिंदे या सर्वांना तपासासाठी अनेक ठिकाणी न्यावे लागते. त्यामुळे चौघांच्याही कोठडीत वाढ करण्यात यावी, असा युक्तिवाद दिल्ली पोलिसांच्यावतीने न्यायालयात करण्यात आला. त्यानंतर न्यायमूर्तींनी आरोपींच्या कोठडीत 15 दिवसांनी वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला. संसदेची सुरक्षा भेदून सभागृहात प्रवेश करण्याबाबत या सर्व आरोपींचा खरा हेतू अद्याप समजू शकलेला नाही, आम्हाला काही पुरावे मिळाले आहेत. विशेष पथकाकडून संबंधितांचे सोशल मीडिया अकाऊंट तपासावे लागतात. सापडलेले पुरावे क्रॉस व्हेरिफाय करावे लागतात, असे दिल्ली पोलिसांनी न्यायालयात सांगितले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान 13 डिसेंबर रोजी संसदेच्या सुरक्षेतील मोठी त्रुटी समोर आली होती. त्यादिवशी, दुपारी एकच्या सुमारास लोकसभेच्या कामकाजादरम्यान दोन तऊणांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारली. तसेच पिवळ्या रंगाचा धूरही दालनात पसरवला. त्याचवेळी आणखी दोघांनीही संसद भवनाबाहेर पॅनमधून रंगीत धूर पसरवला आणि घोषणाबाजी केली. या प्रकारानंतर पोलिसांनी तत्काळ या चार आरोपींना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सूत्रधार मानला जाणारा ललित झा याला अटक केली. याप्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा किंवा युएपीए अंतर्गत संबंधितांविऊद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.