जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धेत फोंडा हायस्कुलने पटकाविली चॅम्पियनशिप
वेंगुर्ले (वार्ताहर)-
सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशन आणि उपरकर शूटिंग अकॅडमी वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धेचे आयोजन उपरकर शूटिंग अकॅडमी, कॅम्म, वेंगुर्ला येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये फोंडा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जनरल चॅम्पियनशिप पटकाविली. सदरच्या स्पर्धेमध्ये वेंगुर्ला, सावंतवाडी, वैभववाडी, कुडाळ, देवगड व कणकवली या तालुक्यातून स्पर्धक सहभागी झाले होते. ही स्पर्धा १० मीटर ओपन साईट, १० मीटर पीप साईट व १० मीटर पिस्तूल प्रकारात घेण्यात आली. स्पर्धेच्या बक्षीस समारंभास सावंतवाडी नगरपालिकाचे मुख्याधिकारी सागर साळुंखे, गडचिरोलीचे सीमा सुरक्षा दल इन्स्पेक्टर प्रशांत परब, आंतरराष्ट्रीय पंच विक्रम भांगले, सुभेदार पुंडलिक धर्णे, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप तसेच उपरकर शूटिंग अकॅडमीचे प्रशिक्षक कांचन उपरकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सातार्डा हायस्कूलचे मुख्याध्यापक तसेच नेमबाज प्रशांत सावंत यांनी केले. या स्पर्धेस श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट ओरोसचे चिराग बांदेकर तसेच लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह बँक, वेंगुर्ला पुरस्कर्ते म्हणून लाभले होते. सर्व विजयी खेळाडूंचे जिल्हा शूटिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे आहे. ओपन साईट खुला गट पुरुष-प्रथम मयुरेश बापू भोगटे, (कुडाळ), द्वितीय-शुभम संतोष साटम, (कणकवली), तृतीय- गोपाळ तातोबा हरमलकर, (कसाल), ओपन साईट खुलागट महिला-प्रथम-रूपाली संतोष दाभोलकर (वेंगुर्ला), द्वितीय-प्राची प्रकाश राघव (देवगड), तृतीय-सोनाली संतोष चेंदवणकर (वेंगुर्ला), ओपन साईट १६ वर्षाखालील मुले-प्रथम-सिश सुनील सांडीम (फोंडाघाट), द्वितीय-राज अजय परब (फोंडाघाट), तृतीय-प्रसाद राजेश पाटील (फोंडाघाट), ओपन साईट १६ वर्षाखालील मुली-प्रथम-स्नेहल सुजित राऊळ (सांगेली), द्वितीय-वृंदा भरत मोरे, (फोंडाघाट) तृतीय. सेजल सखाराम हुबे (फोंडाघाट), खुला गट पिपसाईट पुरुष-प्रथम-विनय शिवराम सावंत (कसाल), द्वितीय-रोहन पुरुषोत्तम कांबळी (खारेपाटण), तृतीय-चैतन्य बापू तुळसकर (वेंगुर्ला), खुला गट पीप साईट महिला प्रथम-रूपाली संतोष दाभोलकर (वेंगुर्ला), द्वितीय-पद्मश्री अनंत शेट्ये (वेंगुर्ला), तृतीय-प्रतीक्षा निलेश शिरोडकर (वेंगुर्ला), १६ वर्षाखालील मुले पीप साईट-प्रथम-शिवम नरेंद्र चव्हाण (सावंतवाडी), द्वितीय-गौरव दत्तप्रसाद आजगावकर (वेंगुर्ला), तृतीय-निलराज निलेश सावंत (सावंतवाडी), १६ वर्षाखालील गट मुली पीप साईट-प्रथम-हंसिका आनंद गावडे (सांगली), खुला गट-एअर पिस्तूल पुरुष-प्रथम सुभाष चंद्रकांत बोवलेकर (वेंगुर्ला), व्दीतीय-पार्थ नवनीत देसाई (बांदा), तृतीय-दत्तप्रसाद निळकंठ आजगावकर (वेंगुर्ला), खुला गट-एअर पिस्तूल-महिला- प्रथम-स्वाती बाबाजी परब (आकेरी), द्वितीय-सफिना सलीम बागवान (सावंतवाडी), तृतीय-सौं. श्रध्दा भूषण परब (कुडाळ), १६ वर्षाखालील मुले-एअर पिस्तुल प्रकास्-प्रथम-शंतनू श्याम लाखे (सावंतवाडी), द्वितीय-ऋतुराज सागर लाखे (सावंतवाडी), तृतीय-यश सुदेश आंगचेकर (वेंगुर्ला), १६ वर्षांखालील मुली एअर पिस्तूल-प्रथम-अन्वीता अनाजी सावंत (कणकवली), द्वितीय-अवनी मेघश्याम भांगले (सावंतवाडी), तृतीय-सई समीर कांबळी (कुडाळ) यांनी क्रमांक पटकाविले.