For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देव श्री बोडगेश्वराचा जत्रोत्सव आजपासून

01:28 PM Jan 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
देव श्री बोडगेश्वराचा जत्रोत्सव आजपासून
Advertisement

8 जानेवारीपर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

Advertisement

म्हापसा : म्हापशातील जागृत व हाकेला पावणारा देव श्री बोडगेश्वरचा 91 वा महान जत्रोत्सव  तसेच देवस्थानाचा 33 वा वर्धापनदिन आज शुक्रवार दि. 2 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त 8 जानेवारीपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त आज शुक्रवार दि. 2 रोजी दु. 12 वा. श्री देव बोडगेश्वराच्या 91 वा महान जत्रोत्सवाला प्रारंभ होईल. दु. 1 वा. महाप्रसाद, सायं. 5.30 वा. स्वर भगिनी प्रस्तुत अभंग, भावगीत व नाट्यागीतांचा कार्यक्रम सायं. 7.30 वा. ‘गीत बहार’ हा अभंग, भावगीत व भक्तीगीतांचा कार्यक्रम सादर होईल. रात्री 12 वा. दशावतारी नाटक ‘मायाजाल’ सादर होईल. शनिवार दि. 3 रोजी सकाळी 10 वा. देवस्थानतर्फे श्री सत्यनारायण महापूजा, दु. 1 वा. महाप्रसाद, सायं. 5.30 वा. भजन, 7.30 वा. ‘फुलले रे क्षण माझे’ हा मराठी भावगीत, भक्तीगीत, चित्रपटगीत, नाट्यागीत, यांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. रविवार दि. 4 रोजी सकाळी 10 वा. पिकअप-ड्रायव्हर असोसिएशन म्हापसातर्फे श्री सत्यनारायण महापूजा, दु. महाप्रसाद, सायं. 5.30 वा. संगीत संध्या हा सुगम संगीताचा कार्यक्रम, सायं. 7.30 वा. स्वर धारा हा कार्यक्रम होईल.

Advertisement

सोमवार दि. 5 रोजी सकाळी 10 वा. म्हापशातील मासळी विक्रेत्या महिलांतर्फे श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी महाप्रसाद, सायं. 5 वा. वेषभूषा स्पर्धा होईल.(वयोगट 5 ते 9 व 10 ते 14) स्पर्धेचे पहिले बक्षीस रु.3000, दुसरे बक्षीस रु. 2500, तिसरे बक्षीस रु.2000 दोन उत्तेजनार्थ बक्षिसे रु.1000 (स्पर्धकांनी संध्या. 4 वा. हजर राहावे). सायं. 7 वा. निधी स्कूल ऑफ डान्स यांचे भरतनाट्याम नृत्य होणार आहे. रात्री 8.30 वा. ‘स्वर अनंत’ भावगीत, नाट्यागीतांचा कार्यक्रम होईल. मंगळवार दि. 6 रोजी सकाळी 10 वा. रिक्षा-ड्रायव्हर असोसिएशन (कदंबा स्टॅण्ड) म्हापसातर्फे श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी महाप्रसाद, सायं. 5.30 वा. ‘नृत्य मार्ग’ शास्त्रीय भरतनाट्याम कार्यक्रम होईल. सायं. 7.30 वा. स्वर गंधार हा कार्यक्रम सादर होईल.

बुधवार दि. 7 रोजी सकाळी 10 वा. म्हापसा नगरपालिकेतर्फे श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी महाप्रसाद, सायं. 5.30 वा. भावगीत, भक्तीगीत, अभंग, नाट्यागीतांचा कार्यक्रम होईल. सायं. 7.30 वा. स्वर ईश्वर भक्तीगीत, अभंगाचा कार्यक्रम होईल. गुरुवार दि. 8 रोजी सकाळी 10 वा. म्हापसा भाजी विक्रेत्यांतर्फे श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी महाप्रसाद, सायं. 5.30 वा. आराधना नृत्य कला केंद्र कु. रक्षंदा महेंद्र आमोणकर प्रस्तुत शास्त्राrय व उपशास्त्राrय नृत्याविष्कार, सायं. 7.30 वा. सांज सुरांची भावगीत, भक्तीगीत, अभंग व नाट्यागीतांचा कार्यक्रम होईल. भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष आनंद भाईडकर व कार्यकारी मंडळाने केले आहे.

Advertisement
Tags :

.