For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडीकरांसाठी 'सुंदरवाडी मिनी महोत्सवाची' पर्वणी

03:10 PM Dec 22, 2023 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडीकरांसाठी  सुंदरवाडी मिनी महोत्सवाची  पर्वणी
Advertisement

२७ ते ३१ डिसेंबर या कालावधीत महोत्सव

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

सावंतवाडी येथील शहरात पालिकेच्या उद्यानासमोर 27 ते 31 डिसेंबर रोजी सुंदरवाडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.दीपक केसरकर मित्र मंडळ शिवसेना शहर शाखा, इनरव्हील क्लब,रोटरी क्लब व सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे याबाबतची माहिती माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी दिली.

Advertisement

येथील शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी त्यांच्यासोबत शिंदे शिवसेनेचे शहर प्रमुख बाबू कुडतरकर रोटरी क्लबचे अध्यक्ष सुहास सातोसकर, राजेश पनवेलकर, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा रिया रेडीज, दर्शना रासम, डॉ नीला जोशी, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव संजय पेडणेकर आदी उपस्थित होते.

श्री.पोकळे म्हणाले, सावंतवाडी शहरातील नागरिकांसाठी मनोरंजनात्मक दृष्ट्या या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे व महोत्सवात गार्डन परिसरामध्ये खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात येणार आहे तर चारही दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 27 डिसेंबरला रेकॉर्ड स्पर्धा यामध्ये लहान गट व मोठा गट 28 डिसेंबरला ओंकार कला मंच सांस्कृतिक कार्यक्रम तर 29 डिसेंबरला लावण्यखणी हा नृत्याचा कार्यक्रम होणार आहे ठाकरे या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक बांधिलकीच्या वतीने करण्यात आले आहे.30 डिसेंबर रोजी इनरव्हील क्लब च्या वतीने 'इनरव्हील क्वीन' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर 31 डिसेंबर रोजी रोटरी क्लबच्या माध्यमातून हेमांगी सावंत यांचा ऑर्केस्ट्रा कार्यक्रम होणार आहे तरी शहरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.

Advertisement
Tags :

.