For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंडोनेशियात फेरीबोटीला आग; अनेकांचा मृत्यू

06:55 AM Aug 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
इंडोनेशियात फेरीबोटीला आग  अनेकांचा मृत्यू
Advertisement

5 मृतदेह सापडले : बोटीवर 271 प्रवासी, 41 जण अद्याप बेपत्ता; बचावकार्य सुरू : भर समुद्रातील दुर्घटनेने हाहाकार

Advertisement

वृत्तसंस्था

मदुरा

Advertisement

इंडोनेशियातील मदुरा बेटाच्या किनाऱ्याजवळ रविवारी एक भीषण सागरी दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेल्या फेरीला लागलेल्या भीषण आगीत किमान पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर 41 जण अद्याप बेपत्ता आहेत. त्यांना शोधण्यासाठी मोठे बचावकार्य सुरू करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. फेरीला लागलेल्या आगीचे कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. ही आग तांत्रिक बिघाडामुळे लागली की सुरक्षा मानकांमधील हलगर्जीपणामुळे याचा तपास इंडोनेशियन अधिकारी करत आहेत.

‘केएम मुतियारा सेंटोसा-2’ ही फेरीबोट पूर्व जावामधील सुराबाया येथून दक्षिण सुलावेसीमधील मकासारकडे प्रवास करत होती. प्रवासादरम्यान, मदुरा बेटाजवळील सुमेनेप रीजन्सीजवळ जहाजाला अचानक आग लागली. आग झपाट्याने पसरल्याने धुराच्या दाट लोटाने बोटीला वेढले. इंडोनेशियन शोध आणि बचाव संस्थेच्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी फेरीवर एकूण 271 प्रवासी आणि कर्मचारी होते.

बचावकार्य सुरू

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक अधिकारी आणि बचाव यंत्रणांनी प्रतिसाद दिला. रविवार दुपारपर्यंत, बचाव कर्मचाऱ्यांनी अंदाजे 225 लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले होते. बेपत्ता असलेल्या 41 लोकांचा शोध घेण्यासाठी अनेक बचाव जहाजे तैनात करण्यात आली होती. इंडोनेशिया हा 17,000 हून अधिक बेटांचा जगातील सर्वात मोठा द्वीपसमूह असून येथे फेरीबोट हेच वाहतुकीचे मुख्य साधन आहे.

Advertisement
Tags :

.