For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नास्नोळ्यात विद्यार्थिनीचा संशयास्पदरित्या मृत्यू

04:45 PM May 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
नास्नोळ्यात विद्यार्थिनीचा संशयास्पदरित्या मृत्यू
Advertisement

शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

Advertisement

म्हापसा : नास्नोळा येथे एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने नास्नोळा गाव हादरून गेले आहे. ती मुलगी घरात एकटीच कॉटवर मृतावस्थेत आढळून आल्याने गूढ वाढले आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मयत मुलीचे नाव टिया नारायण परब (वय 17 वर्षे) हळदोणा येथील सेंट थॉमस हायस्कूलमध्ये शिकत होती. शांत स्वभावाची, मनमिळावू व्यक्तिमत्व होती. शिक्षणात हुषार विद्यार्थिनी म्हणून तिच्याकडे पाहिले जात होते. आईचा तिनदा फोन घेतला नाही  टियाची आई नास्नोळा येथे गिरणीवर काम करते, तर वडील गोमेकॉत कामाला असतात. सकाळी आई गिरणीवर गेली. त्यानंतर सकाळी 10 वाजता आईने टियाला फोन केला, तिने फोन उचलला नाही. नंतर दुपारी 12 वाजता तसेच पुन्हा दुपारी अडीच वाजता आईने फोन केला असता टियाने फोन उचलला नाही.

आई घरी येऊन पाहते तर...

Advertisement

सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान आई लवकर परतली. घरात प्रवेश केला असता टिया आपल्या खोलीत कॉटवर पडलेली आढळून आली. याबाबत तिने वडिलांना कळविल्यानंतर सर्वजण घरी आले. शेजारी सर्वेश रायकर, पंच सदस्य गोविंद गोवेकर, सतीश गोवेकर आदी आले. पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. पंचनामा करून मृतदेह म्हापसा जिल्हा आझिलो इस्पितळात नेला असता ड्युटीवरील डॉक्टरांनी टियाला मृत घोषित केले. उपनिरीक्षक आदित्य गाड यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी गोमेकॉत पाठविण्यात आला.पोलिस अधीक्षक सलीम शेख यांनी सांगितले की मयताचा व्हिसेरा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण सांगता येईल. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यावर स्थानिक आमदार कार्लोस फेरेरा यांनी टियाच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच वैद्यकीय अहवालाची माहिती जाणून घेऊन त्यांनी पोलिस निरीक्षक व डॉक्टरांशी संपर्क साधला.  सायंकाळी टियावर शोकाकुल वातावरणात नास्नोळा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Advertisement
Tags :

.