Kolhapur Crime | पती-पत्नीचा वाद, आरोपीला मदतीचं आमिष आणि 'ती' लाचेची मागणी; कोल्हापुरातील महिला PSI वर अटकेची टांगती तलवार!
कोल्हापूर : शहरातील महत्वाच्यापोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकाने पती-पत्नीच्या कौटुंबीक बादातील गुन्ह्यात आरोपीला मदत करण्यासाठी त्याच्याकडे लाचेची मागणी केल्याचा प्रकार सोमवारी रात्री उशिरा उघडकीस आला.
संबंधित महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेताना रंगेहात पकडण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पोलीस स्टेशनच्या परिसरात सापळा रचला होता. त्याची चाहूल महिला पोलीस उपनिरीक्षकास लागताच तिने लाचेची रक्कम स्वीकारली नाही.
एसीबीच्या अधिकाऱ्यांनीसंबंधित महिला पोलिस अधिकाऱ्याकडे चौकशी केली. मागणी केलेली लाचेची रक्कम स्वीकारली नसल्याने, तसेच रात्री उशीर झाल्यामुळे महिला पोलिस उपनिरीक्षकावरील अटकेची कारवाई टळली. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.आज, मंगळवारी अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे. रात्री नऊच्या सुमारास पोलिस ठाण्यातील सर्व अंमलदारांची हजेरी सुरू असतानाच हा प्रकार घडल्याने काही क्षणात याची माहिती जिल्हात सर्वत्र पसरली.