For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Woman Officer Molestation Solapur जात पडताळणी समितीतील महिला अधिकाऱ्याचा विनयभंग, सहाजणांवर गुन्हा दाखल

05:20 PM Jun 12, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
woman officer molestation solapur जात पडताळणी समितीतील महिला अधिकाऱ्याचा विनयभंग  सहाजणांवर गुन्हा दाखल
Advertisement

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयात कार्यरत असलेल्या एका महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून सदर बझार पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनयभंग, मानसिक छळ, अपमानास्पद वर्तन तसेच शासकीय कामकाजात अडथळे निर्माण केल्याचे गंभीर आरोप या तक्रारीत करण्यात आले आहेत.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र कदम, मंजुषा गायकवाड (शासकीय लिपिक), श्रीकांत शिवलकर (करारनामा विधी अधिकारी), विशाल लागबडे (करारनामा कर्मचारी), सूर्यकांत कटारे आणि स्वप्निल दरुडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २७ मार्च २०२५ ते १७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारदार महिला अधिकारी या काळात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमध्ये कार्यरत होत्या. या दरम्यान आरोपींनी संगनमत करून कार्यालयीन कामकाजात अडथळे निर्माण केले, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे, ऑनलाइन प्रमाणपत्र वितरण प्रक्रियेत जाणूनबुजून विलंब करणे, विविध प्रकरणे प्रलंबित ठेवणे आणि प्रशासकीय आदेशांचे पालन न करणे असे प्रकार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Advertisement

याशिवाय संबंधित महिला अधिकाऱ्याशी अपमानास्पद वर्तन करून त्यांचा अवमान करण्यात आला. लिंगभेदी स्वरूपाची वक्तव्ये करून मानसिक त्रास दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या सततच्या त्रासामुळे कामकाजावर परिणाम झाल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर बझार पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

Advertisement
Tags :

.