For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महिला अधिकाऱ्याने रचला इतिहास

07:00 AM Sep 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
महिला अधिकाऱ्याने रचला इतिहास
Advertisement

शक्ति शर्मा पहिल्या बिगर-चिकित्सकीय महिला एअर वाइस मार्शल

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

भारतीय वायुदलात एअर वाइस मार्शल शक्ति शर्मा यांनी इतिहास रचला आहे. देशाच्या सशस्त्र दलांमध्ये एअर वाइस मार्शल किंवा समकक्ष रँक प्राप्त करणाऱ्या त्या पहिल्या बिगर-चिकित्सकीय महिला अधिकारी ठरल्या आहेत. शर्मा यांनी मंगळवारी वायुदल मुख्यालयात सहाय्यक वायुदल प्रमुख (शिक्षण) पद सांभाळले आहे. यापूर्वी त्या एअर कमोडोरच्या पदावर कार्यरत होत्या. सशस्त्र दलांमध्ये यापूर्वी कुठलीही बिगर-चिकित्सकीय महिला अधिकारी एअर वाइस मार्शलच्या पदापर्यंत पोहोचली नव्हती. त्यांची नियुक्ती महिला अधिकाऱ्यांचे वाढते नेतृत्व अन् जबाबदाऱ्या दर्शविते. ही कामगिरी भारतीय वायुदलात महिलांसाठी एक नवा अध्याय देखील मानला जात आहे.

Advertisement

शक्ति शर्मा या 18 जून 1994 रोजी वायुदलात सामील झाल्या होत्या. 3 दशकांपेक्षा अधिक काळाच्या कारकीर्दीत त्यांनी प्रशिक्षण संस्था, फील्ड स्टेशन्स, कमांड मुख्यालय आणि एअर मुख्यालयात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. दीर्घ अनुभवानंतर त्यांना आता एअर मुख्यालयात सहाय्यक वायुदल प्रमुख (शिक्षण) ही जबाबदारी देण्यात आली आहे. शर्मा यांनी प्रशिक्षण अन् संरक्षणाशी निगडित अनेक महत्त्वपूर्ण संस्थात्मक कामांमध्ये नेतृत्व केले आहे. आयआयटी कानपूर, आणि पुणे विद्यापीठात वायुदलाचे उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या केंद्रांचा उद्देश शिक्षण अन् संरक्षणाशी निगडित रणनीतिक सहकार्याला चालना देणे होता.

Advertisement
Tags :

.