For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आर. पी .डीत स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

11:23 AM Jul 16, 2024 IST | अनुजा कुडतरकर
आर  पी  डीत स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

स्पर्धेचे युग हे न संपणारे युग असून या युगात यशस्वी होण्यासाठी जाणीवपूर्वक कोण काय बोलतात,काय करतात यांसारखे अनेक नकारात्मक विषयांकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून सातत्यपूर्ण अभ्यास केल्यामुळेच सुदृढ यशाला गवसणी घालता येऊ शकते. असे राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी येथे आयोजित सी.ई.टी,एन.एम.एन.एस, स्कॉलरशिप, एम.के.सी.एल ऑलिम्पियाड,यासारख्या स्पर्धात्मक परीक्षेत कौतुकास्पद यश संपादित केलेल्या  विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे संस्था अध्यक्ष विकासभाई सावंत बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेचे मुख्याध्यापक जगदीश धोंड यांच्या प्रास्ताविक पर भाषणात शिष्यवृत्ती, स्पर्धात्मक परीक्षांविषयी राणी पार्वतीदेवी हायस्कूल व जुनियर कॉलेजच्या प्रगतीचा आढावा घेत, उपस्थित विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले. तसेच शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी संचलित दोडामार्ग न्यू इंग्लिश स्कूल दोडामार्ग या प्रशालेतील विद्यार्थिनीं कुमारी चिन्मयी खानोलकर इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी विभागातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवले आणि आर.पी.डी हायस्कूल सावंतवाडीच्या कुमार योगेश जोशी या विद्यार्थ्याचा इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यांत तिसरा क्रमांक आला यांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. दोडामार्ग प्रशालेतून अनुक्रमे चिन्मय हेमंत सावंत, गिरीजा बाबुराव धुरी या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करून गौरविण्यात आले.तर विद्यार्थ्यांमधून मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी शालांतर्गत व बोर्ड परीक्षाच्या सोबत स्पर्धात्मक परीक्षांचे देखील एकत्रित अभ्यास करणे गरजेचे आहे. व प्रश्नपत्रिका सोडवत सतत सराव करत त्या सरावात सातत्य ठेवणे आणि या परीक्षांच्या अभ्यासामध्ये समतोल तसेच वेळेचे नियोजन व वेळोवेळी शिक्षकांचे मार्गदर्शन याशिवाय यशाला गवसणी घालणे अशक्य आहे हे सांगितले. या कार्यक्रमाला व्यासपीठावरती संस्थेचे संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी.एल. नाईक.संचालक चंद्रकांत सावंत, श्रीमती सोनाली सावंत,प्रा.सतीश बागवे आणि माजी उपमुख्याध्यापक शेखर नाईक,उपप्राचार्य डॉ.सुमेधा नाईक, उपमुख्याध्यापक प्रल्हाद सावंत, पर्यवेक्षक संप्रवी कशाळीकर आनंदी कॉम्प्युटरचे संचालक मेघश्याम काजरेकर उपस्थित होते. त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक व विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थी, प्रसिद्धी कमिटी प्रमुख प्रा.रणजीत राऊळ , प्रा. दशरथ राजगोळकर,प्रा.संतोष पाथरवट,डॉ.संजना ओटवणेकर,प्रा.सविता कांबळे,डाॅ.अजेय कामत,प्रा.पवन वनवे प्रा. विनीता घोरपडे ,प्रा. माया नाईक.,प्रा. राहुल कदम,प्रा. स्पृहा टोपले.तसेच माध्यमिक विभागाकडील दशरथ शृंगारे, प्रिती सावंत, नामदेव मुठे, मानसी नागवेकर,आदी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार श्रीमती संप्रवी कशाळीकर यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. मिलिंद कासार आणि श्रीमती.पुनम कदम यांनी केले.

Advertisement
Advertisement
Tags :

.