For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त मान्यवरांचा सत्कार

12:38 PM May 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त मान्यवरांचा सत्कार
Advertisement

पुणे येथील बालगंधर्व कलादालनात कार्यक्रम

Advertisement

बेळगाव : जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त पुणे येथील बालगंधर्व कला दालनात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ज्येष्ठ व्यंगचित्रकार व शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची देशभरातील नामवंत चित्रकारांनी आपापल्या शैलीतून रेखाटलेली चित्रे व अर्कचित्रे प्रदर्शित करण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून काही व्यंगचित्रकारांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये बेळगावचे जगदीश कुंटे यांचाही सत्कार करण्यात आला. या महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांच्या हस्ते झाले. हा संपूर्ण कार्यक्रम महाराष्ट्र व्यंगचित्रकार ग्रुप, कार्टुन कट्टा आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे आयोजित करण्यात आला होता.

Advertisement
Advertisement
Tags :

.