घर महाग वाटल्याने जगभ्रमंती
छोट्या मुलीसोबत दांपत्याचा जगप्रवास
ब्रिटनचे एक दांपत्य वर्ल्ड टूरवर आहे. स्वत:च्या आयुष्यात स्थिरसावर होत पैसे जोडत जग फिरू इच्छित नसल्याने ते या जगभ्रमंतीवर नाहीत. तर घर उभारणे महाग वाटल्यानेच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. विदेशात फिरणे आम्हाला ब्रिटनमध्ये राहण्यापेक्षाही स्वस्त पडत आहे. जुलैमध्ये सुरू केलेल्या स्वत:च्या गॅप ईयरच्या योजनेवेळी घरी राहण्याचा खर्च प्रवासापेक्षा अधिक असल्याचे जाणवले. आमचा मासिक खर्च 5400 ते 6700 डॉलर्सपर्यंत पोहोचायचा. यातील निम्मी रक्कम केवळ भाडे आणि वास्तव्यासाठी खर्च व्हायची असे 37 वर्षीय हेली ट्रोने सांगितले.
सुटी घेत वाचविले पैसे
या पार्श्वभूमीवर दांपत्याने सर्वप्रथम स्वत:च्या ऑफिसमधून एक वर्षाची सुटी घेतली. यानंतर पैसे वाचविण्यासाठी आईवडिलांसोबत वास्तव्य पेल आणि मग स्वत:ची मुलगी नायलाचे शिक्षण ऑनलाइन ट्यूटरिंग आणि बालीच्या एका मल्टीकल्चरल स्कूलमधून करविले. या प्रवासात त्यांनी स्वत:च्या मुलीचा वाढदिवस डिस्नेलँड पॅरिसमध्ये साजरा केला आणि मग इटलीत हिंडण्यासाठी पोहोचले. येथे लेक कोमो, मिलान, व्हेनिस, रोम, नेपल्स आणि पुग्लिया येथे ते फिरले.
आणखी एक वर्ष फिरत राहणार
सध्या दांपत्य बाली येथे राहत असून नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया कॅम्परवॅन टूर करणार आहे. पुढील वर्षी सिंगापूर, मलेशिया, थायलंड, श्रीलंका आणि मालदीव येथे जाण्याची योजना आहे. नायलासाठी या आठवणी आणि अनुभव महत्त्वाचा आहे. मुले पुस्तकांमधून नव्हे तर जग पाहून खूप काही शिकू शकतात. नायला आमच्या कामाचा ताण आठवणीत ठेवणार नाही, तर भ्रमण आठवणीत ठेवेल, असे हेलीने सांगितले.