For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बारह नंबर’मध्ये एहसास

06:53 AM Jun 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
बारह नंबर’मध्ये एहसास
Advertisement

अभिनेता, कॉमेडियन आणि फिल्ममेकर वीर दासने स्वत:च्या पुढील दिग्दर्शकीय चित्रपट बारह नंबर’ची घोषणा केली आहे. या चित्रपटात शीबा चड्ढा, अरुणोदय सिंह, एहसास चन्ना आणि अतुल कुलकर्णी यासारखे कलाकार आहेत. हा सायकोलॉजिकल हॉररपट असणार आहे. दासने चालू वर्षाच्या प्रारंभी ‘हॅप्पी पटेल : खतरनाक जासूस’ चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण केले होते. बारह नंबर चित्रपटासाठी वीर दास पुन्हा सहदिग्दर्शक कवि शास्त्राrसोबत पुन्हा काम करणार आहे. या चित्रपटात वीर दास भूमिकाही साकारणार असून त्याच्यासोबत निहारिका लायरा दत्त, श्रिया पिळगावकर, सुहैल नय्यर, पूजा स्वरुप आणि नवीन कौशिकही दिसून येणार आहेत.

Advertisement

या प्रोजेक्टमध्ये सामील असलेले सर्व कलाकार अभिनयनिपुण आहेत. प्रेक्षकांना प्रत्येक क्षण खरा वाटला तरच भयपट प्रेक्षकांना पसंत पडतो. या कलाकारांच्या टीमने कहाणीला मोठे स्वरुप मिळवून दिले असल्याचा दावा वीर दासने केला आहे. एहसासने यापूर्वी अनेक वेबसीरिजमध्ये काम करत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. हा चित्रपट तिच्यासाठी एकप्रकारे मोठी संधी ठरणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.