For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फेडरल बँकेचा नफा 14 टक्क्यांनी वाढला

06:58 AM May 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
फेडरल बँकेचा नफा 14 टक्क्यांनी वाढला
Advertisement

वाढीसह नफा कमाई 1,030 कोटींवर

Advertisement

मुंबई :

2024-25 च्या चौथ्या तिमाहीत फेडरल बँकेचा नफा वार्षिक आधारावर 14 टक्क्यांनी वाढून 1,030 कोटी रुपये झाला. संपूर्ण आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये, कंपनीचा नफा 9 टक्क्यांनी वधारुन 4,052 कोटी रुपये झाला. जानेवारी ते मार्च 2025 पर्यंत, फेडरल बँकेने एकूण 7,654 कोटी रुपये कमावले. त्याच वेळी, 2024-25 या आर्थिक वर्षात बँकेचे एकूण उत्पन्न 30,167 कोटी रुपये होते.

Advertisement

2024-25 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत बँकेचा नफा बाजार विश्लेषकांच्या अपेक्षेपेक्षा चांगला राहिला आहे, म्हणजेच बँकेने यावेळी चांगली कामगिरी केली आहे. बँकेने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी प्रति समभाग 1.20 रुपये अंतिम लाभांश जाहीर केला आहे.

Advertisement
Tags :

.