For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रशासकीय दिरंगाईला कंटाळून उपसरपंचांचा उपोषणाचा इशारा

02:38 PM Jan 10, 2026 IST | अनुजा कुडतरकर
प्रशासकीय दिरंगाईला कंटाळून उपसरपंचांचा उपोषणाचा इशारा
Advertisement

सोनुर्ली - निगुडे मार्गावरील पुलाबाबत दिले बांधकाम उपअभियत्यांना निवेदन

Advertisement

न्हावेली /वार्ताहर
सोनुर्ली निगुडे मार्गावरील रेल्वे पुलाजवळ असलेला ओहळावरील पूल पूर्णत : कमकुवत झाले असून येत्या आठ दिवसात यासंदर्भात कार्यवाही न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालसमोर २६ जानेवारी रोजी उपोषण छेडण्याचा इशारा सोनुर्ली उपसरपंच भरत गावंकर यांनी दिला आहे.याबाबतचे निवेदन त्यांनी सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता अजित पाटील यांना दिले आहे.सोनुर्ली ते निगुडे या रस्त्याचे दोन वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आले.मात्र या मार्गावरील महत्त्वाच्या पूलाचे काम प्रलंबित ठेवण्यात आले.सद्या या पूलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून तो पूर्णत : कमकुवत झाला आहे.गेल्या पावसाळ्यात या पुलाची सरंक्षण भिंत कोसळली होती.येत्या पावसळ्यापूर्वी जर या पुलाची पुनर्बांधणी किंवा दुरुस्ती झाली नाही तर हा पूल वाहून जाण्याची दाट शक्यता आहे.हा रस्ता स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे.जर पूल कोसळला तर या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होईल त्याचा मोठा फटका शेतकरी वर्गाला बसणार आहे.गेल्या दोन वर्षापासून आपण सातत्याने या पुलाच्या कामाची पाहणी प्रशासनाकडे करत आहेत मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही.त्यामुळे प्रशासकीय दिरंगाईला कंटाळून आपण उपोषणाचे हत्यार अवलंबले आहे.येत्या आठ दिवसात या पुलाबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास २६ जानेवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांच्या कार्यालयासमोर आपण उपोषणाला बसल्याचा निर्णय उपसरपंच श्री.गावकर यांनी घेतला आहे.उपोषण दरम्यान आपल्या जिवितास काही बरे वाईट झाल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी संबंधित विभागाची राहील,असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.