Cultural Kolhapur : पाहताच क्षणी 'व्वा' शब्द निघणाऱ्या Shalini Palace चे वैशिष्ट्य काय आहेत?
शालिनी पॅलेस रंकाळा तलावाच्या पश्चिम काठावर आहे
By : सुधाकर काशीद
कोल्हापूर : रंकाळा तलावाच्या पश्चिम बाजूस एक सुंदर वास्तू आहे. शालिनी पॅलेस म्हणून या वास्तूची ओळख आहे. एखाद्या राजवाड्याचे स्वरूप या वास्तूला आहे. फार नाही, पShalini Palaceण ही वास्तू शंभर-सव्वाशे वर्षापूर्वीची आहे. रंकाळा तलावाच्या काठावरची ही वास्तू रंकाळ्याशी अगदी एकरूप होऊन गेली आहे.
किंबहुना शालिनी पॅलेस शिवाय रंकाळा तलाबास आणि रंकाळा तलावाशिवाय शालिनी पॅलेस वास्तूला शोभाच येत नाही, अशी सद्यस्थिती आहे. ही वास्तू कधी बांधली, कोणी बांधली, याची संगमरवरी पाटी या वास्तूबर होती. पण काही वर्षापासून ती पाटीही तेथे नाही, बास्तूही बंद आहे.
आजूबाजूला झाडे-झुडपे, रानगवत वाढले आहे. वास्तूचे अस्तित्व ठळक दिसतच नाही. फक्त मनोरा आणि त्यावरचे बंद घड्याळ लांबून दिसते. वर्षानुवर्ष बंद असलेले ते घड्याळ काळाचा महिमाच दाखवते. या वास्तूला अशी अवस्था का आली, हा विषय वेगळा आहे. पण या शालिनी पॅलेस वास्तूच्या बांधकामाचे ओव्हर सियर रामराव नागेशकर यांना बिल्डर असोसिएशनच्यावतीने आज मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
त्यामुळे बंद असलेल्या शालिनी पॅलेसचे अंतरंग कसे असेल, शालिनी पॅलेस का बांधला असेल, ही कुतूहल मिश्रीत चर्चा पुन्हा कोल्हापूरकरांच्या मनात डोकावू लागली आहे. शालिनी पॅलेस रंकाळा तलावाच्या पश्चिम काठावर आहे. बघताक्षणी 'ब्वा' एवढाच शब्द बाहेर पडावा, अशी त्याची रचना आहे. हा पॅ लेस एका आजोबांचे आपल्या नातीवरच्या प्रेमाचे प्रतीक आहे.
शालिनी या छत्रपती राजाराम महाराजांच्या बहीण आक्कासाहेब महाराज यांची नात आहे. शालिनीराजे यांचा विवाह नागपूरचे राजारामसिंह भोसले यांच्याशी झाला. आत्ताचे आपले शाहू संग्रामसिंह भोसले यांच्या त्या आई आहेत. या शालिनीराजे राजाराम महाराजांच्या खूप लाडक्या. अगदी महत्वाचे दौरे शिकार यावेळीही शालिनीराजेंना घेऊनच राजाराम महाराज जायचे.
शालिनीराजे छत्रपती आणि बंधू रंकाळा तलावाच्या पश्चिम बाजूस शालिनी पॅलेस त्यांनी बांधला. खूप चांगला आणि ऐसपैस असा हा पॅलेस आहे. तो मेडिकल कॉलेजसाठी घेण्याचा त्यावेळचा एक प्रयत्न होता. येथे नगरपालिकेची इमारत बसवली जाईल अशीही चर्चा होती. ही वास्त आणि नाव होते.
या वास्तूत शहाजी कॉलेजही काही वर्ष होते. त्यानंतर तेथे चौगुले यांचे हॉटेल होते. पण नेमके काय घडले असेल, आता काय परिस्थिती आहे, माहित नाही. हे हॉटेल बंद आहे. आता एका बँकेच्या ताब्यात ही वास्तू असल्याचे समजते. पॅलेसची देखभाल कशी होते, मालकी ताबा कोणाचा, हे माहीत नाही. पण कोल्हापूरची ही अतिशय सुंदर बास्तू बंदिस्त अवस्थेत आहे, एवढे मात्र स्पष्ट दिसते आहे.
त्या वास्तूची बांधणी कशी झाली, याचा वेध घेता ही वास्तू बांधताना रामराव नागेशकर हे ओव्हरसियर होते. त्या वेळच्या वृत्तपत्रातील बातम्यांत या वास्तूचा राधा निवास पॅलेस असाही उल्लेख आहे. पॅलेस बांधणीवेळी केलेल्या एका समारंभास (चौकट पूजन) खुद्द राजाराम महाराज आठ घोड्यांच्या रथातून आले होते, असाही उल्लेख आहे. साधारण बांधकाम खर्च नऊ लाखांचा आहे. या वास्तूचे बांधकाम ओव्हरसियर रामराव नागेशकर आणि लिंग्रस कॉन्टॅक्टर यांनी केले.
रामराव नागेशकर यांना प्रमोशन
शालिनी पॅलेसचे बांधकाम चांगले केल्याबद्दल २३ जून १९३४ मध्ये काढण्यात आलेल्या संस्थांनच्या एका आदेशात रामराव नागेशकर यांना ५ रुपये पगारवाढ आणि प्रमोशन, सब ओव्हरसीयर नारायण बाबाजी पाटील, ड्राफ्ट्समन गणपती गोबिंद मोरे, तसेच भिवा विष्णू मिस्त्री, विष्णू वासुदेव कबनूरकर, म्हादबा भाऊ राऊत, गणपती हरी डाकवे मिस्त्री, गणपत दाजीबा कदम यांनाही संस्थांनने प्रमोशन दिले. तसेच मेस्त्री डाकवे यांचा मुलगा श्रीपती यास कारकुनाची नोकरी देण्याचा आदेश काढण्यात आला.
या वेगळ्या बांधकामाची नोंद घेऊन आज त्यांना बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाने मरणोत्तर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे. उशिरा का होईना, ही नोंद घेऊन त्या काळातील बांधकाम शैलीचा गौरव झाला आहे. आणि बंद असलेल्या शालिनी पॅलेसला मक्त करून तेथे कोल्हापूरचा सारा इतिहास मांडण्याची गरज आहे.