For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सेंट फ्रान्सिस झेवियरचे फेस्त उत्साहात

12:50 PM Dec 05, 2023 IST | Tarun Bharat Portal
सेंट फ्रान्सिस झेवियरचे फेस्त उत्साहात
Advertisement

मुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदारांचाही सहभाग : पहाटेपासूनच्या प्रार्थनासभांना भाविकांची गर्दी

Advertisement

पणजी : ओल्ड गोवा येथील जगप्रसिद्ध चर्च आवारात सेंट फ्रान्सिस झेवियरचे फेस्त पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरे करण्यात आले. त्यासाठी गोव्यासह देशभरातील हजारो लोकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी झालेल्या मुख्य प्रार्थनासभेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह आमदार राजेश फळदेसाई, मायकल लोबो, आलेक्स रेजिनाल्ड, विजय सरदेसाई, पोलीस महासंचालक जसपाल सिंग व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती. फेस्तासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. पहाटे चार वाजल्यापासून प्रार्थनांना सुऊवात झाली. मुख्य प्रार्थनासभेला विशेष अतिथी फादर सेबेस्त्यांव मास्कारेन्हास यांनी संबोधित केले. गोव्याचे आर्चबिशप फिलीप नेरी फर्रांव तसेच इतर काही राज्यांचे आर्चबिशप हजर होते. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगण, गुजरात व इतर अनेक राज्यांतून आलेल्या भाविकांनी चर्चला भेट दिली तसेच ते फेस्तात सहभागी झाले. अनेक भाविकांनी पायी वारी कऊन फेस्त गाठले.

पहाटे 4 वा. सुऊ झालेल्या प्रार्थना दुपारपर्यंत चालू होत्या. कोकणी, इंग्रजी व इतर काही भाषांमधून त्या करण्यात आल्या. या फेस्तानिमित्त चर्च परिसरात मोठी फेरी भरली असून तेथे विविध प्रकारची दुकाने थाटण्यात आली आहेत. तेथे खरेदीसाठी भाविकांची गर्दी होत असून लहान मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारचे खेळही तेथे आहेत. शिवाय मोठ्यांसाठी देखील विविध प्रकारचे मनोरंजन करणारे खेळही आहेत. त्यात उंच झोपाळा हे प्रमुख आकर्षण. त्या खेळांची मजा लुटण्यासाठी लोक गर्दी करीत आहेत. खाजे, चणे - शेंगदाणे यांची अनेक दुकाने तेथे असून त्यांची खरेदी जोरात चालू आहे. शिवाय हार, फुले, मेणबत्ती विक्रेतेही मोठ्या संख्येने फिरताना दिसतात. वाहतूक व्यवस्थेवर विशेष भर देण्यात आला असून वाहतूक कोंडी होणार नाही तसेच चुकीच्या दिशेने वाहने फिरणार नाहीत याची काळजी घेण्यात येत आहे.

Advertisement

पुढील वर्षी होणार शवदर्शन सोहळा

पुढील वर्षाच्या फेस्तात म्हणजे 2024-25 मध्ये सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे शवप्रदर्शन सोहळा होणार असून तो 21 नोव्हेंबर 2024 ते 5 जानेवारी 2025 या कालावधीत चालेल. दर 10 वर्षांनी हे शवदर्शन होत असते. यापूर्वी 2014-15 मध्ये शवदर्शन झाले होते. गोव्याचे आर्चबिशप फिलिप नेरी फेर्राव यांनी वरील माहिती दिली आहे.

Advertisement
Tags :

.