धास्ती ! चड्डी -बनियन गँगची
दिवसा वर्दळ असलेली शहरे आणि रात्री सन्नाट्यात गेलेली गावे.. त्यातच राज्यातील सुनसान महामार्गावर च•ाr-बनियन गँगने धुमाकूळ घालण्यास सुऊवात केली आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत वाहनचालक आणि प्रवाशांना लक्ष्य करणाऱ्या टोळींचे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. एक काळ या च•ाr-बनियन गँगचा मुंबई पोलिसांनी पूर्णत: बिमोड केला होता. मात्र आता पुन्हा एकदा ही टोळी मुंबईच्या सीमेवर येऊन धडकली असून, याचा वेळीच बंदोबस्त करणे आवश्यक आहे.
लाडक्या बाप्पाला अगदी भक्तीमय वातावरणात निरोप दिल्याने संपूर्ण वातावरण गलबलून गेले होते. गेले बारा दिवस बाप्पाची अगदी मनोभावे पूजा केल्यानंतर त्याला अखेरचा निरोप दिला. बाप्पाच्या स्वागतासाठी कोणी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरला गेले तर कोणी आपले गाव गाठले. बाप्पाच्या आगमनासाठी सर्व तयारीसाठी गणेशभक्त अगदी आनंदात होते. ऊन, वारा, पावसात प्रवास करत गणेशभक्तांच्या मनात एक अनामिक धास्ती होती. ती म्हणजे च•ाr बनियन गँगची. कारण या गँगने पुन्हा एकदा राज्याच्या महामार्गावर धिंगाणा घालत प्रवाशांना लुटण्याचा धडाका सुऊ केला आहे. गणेशभक्तांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी राज्य पोलीस, महामार्ग पोलीस सतर्क होतेच, मात्र च•ाr बनियन गँगने यापूर्वी घातलेल्या हैदोसाने नागरिक धास्तावलेले होते.
ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबर महिना सुऊ होण्याच्या पहिल्या आठवड्यात सिन्नर तालुक्यातील मलढोण आणि दशिंगपूरदरम्यान समफद्धी महामार्गावर दरोडेखोरांनी लोखंडी धारदार वस्तू टाकून छत्रपती संभाजीनगरहून मुंबईकडे जाणाऱ्या वकिलांच्या गाड्यांचे टायर पंक्चर केले. वकिलांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडील 18 लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम पळवून नेली. या लुटीनंतर दरोडेखोर थांबले नाहीत. पहाटेपर्यंत जी गाडी दिसेल तिला अडवून, दगडफेक करून 10 ते 12 दरोडेखोरांनी महामार्गावर अक्षरश: हैदोस घातला होता. अशा धाराशिव-बीडच्या अर्धा डझन दरोडेखोरांना नाशिकचे पोलीस अधिक्षक डॉ. डी. एस. स्वामी आणि त्यांच्या पथकाने अल्पावधीतच अटक केली, परंतु रात्री-अपरात्री समफद्धी महामार्गावरून रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्यांचे काय? निर्मनुष्य महामार्गावरून प्रवास करणे म्हणजे जिवावर बेतण्यासारखे आहे. समफद्धी महामार्ग हा दरोडेखोरांसाठी पर्वणी ठरला आहे. महामार्गावर लुटले गेलेले सर्वच प्रवासी तक्रार करत नाहीत. याचाच फायदा दरोडेखोरांनी घेऊन समफद्धी महामार्गावर आक्रमण सुरू केले आहे. याचा लवकरात लवकर बंदोबस्त होईल, संघटित दरोडेखोरी मोडून काढली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला होता.
त्यातच गणेशोत्सव सुऊ होणार असल्याने, गणेशभक्तांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी राज्य पोलीस सज्ज झाले होते. कारण ही टोळी वेळप्रसंगी जीव देखील घ्यायला मागे-पुढे पाहणार नाही याची कल्पना पोलिसांना होती. यामुळे राज्यातील सर्व महामार्गावर पोलिसांनी गस्त वाढविली होती. यापूर्वी पोलिसांनी अटक केलेल्या टोळीकडून टायर पंक्चर करण्यासाठी वापरलेले लोखंडी खिळे, धारदार शस्त्रs, लाठ्याकाठ्या आणि लुटण्यात आलेले काही दागिने हस्तगत केले आहेत. महामार्गावरील लुटमारीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी आपल्या गाड्या महामार्गावर टायर पंक्चर झाल्यास थांबवू नयेत, असे आवाहन ग्रामीण पोलिसांनी केले होते. त्यातच कोकणाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांची रीघ खूपच मोठी असते. अशावेळी मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे, पुणे-कोल्हापूर या रस्त्यावर अहोरात्र वाहतूक सुऊ असते. यादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी राज्य पोलिसांनी सुरक्षिततेसाठी काही सूचना जारी केल्या होत्या. दोन दशकांपूर्वी धाराशिवचे दरोडेखोर रात्रीच्या वेळेस मुंबईत यायचे. दिसेल त्या कुणाच्याही घरात रात्री घुसायचे. हल्ला करायचे. प्रतिकार करणाऱ्यांना थेट आपल्याकडील हत्यारांनी ठार मारायचे. 2003 च्या सुमारास घाटकोपर (पश्चिम) गोळीबार रोड येथील ममता बिल्डिंगमध्ये घुसलेल्या दरोडेखोरांनी ज्येष्ठ नागरिक नरोत्तम मेहता, त्यांची पत्नी हंसा, मुलगा जय तसेच पहारेकरी माऊती सालम अशा चौघा जणांची निघफ&णपणे हत्या करून घरातील सोने व रोख रक्कम पळवून नेली. घाटकोपरपोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक फत्तेसिंग गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फासेपारधी दरोडेखोरांना धाराशिव-सोलापूर भागात सापळे लावून अटक केली होती.
मालाड येथे रात्री उशिरा पवनबाग हाऊसिंग सोसायटीमध्ये घुसलेल्या दरोडेखोरांनी घटनास्थळी पोहोचलेल्या रवी सावंत आणि अनिल कलाल या मालाड पोलीस ठाण्याच्या पोलीस शिपायांवर व वॉचमनवर प्राणघातक शस्त्रांनी हल्ला करून त्यांना ठार मारले होते. हे मुंबई पोलीस दलातील कुणीही कर्मचारी, अधिकारी अद्यापि विसरलेला नाही. रवी सावंत आणि अनिल कलाल यांच्या हत्या केल्यानंतर दरोडेखोरांनी काही काळानंतर बोरीवलीमध्ये दरोडा घालण्याचा प्रयत्न केला, परंतु तत्कालीन पोलीस उपायुक्त विक्रांत देशमाने यांच्या पथकाने तो हाणून पाडला. पोलिसांच्या गोळीबारात च•ाr-बनियन गँगचा एक सदस्य गंभीर जखमी झाला. त्यानंतर कधी च•ाr-बनियन गँगने मुंबईत पाय ठेवला नाही.
मुंबईत दरोडेखोरांचा वाढता शिरकाव पाहून बहुचर्चित चकमक फेम अधिकारी प्रदीप शर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दरोडेखोरांविऊद्ध तीव्र मोहीम सुरू केली. विलेपार्ले येथे टोनी ऊर्फ अन्थोनी या दरोडेखोराला प्रदीप शर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चकमकीत ठार मारले तर कांजूरमार्ग येथे प्रिन्स नडार व नरेश तोवर यांना पोलीस निरीक्षक प्रफुल्ल भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कंठस्नान घातले. पोलीस निरीक्षक महेश तावडे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी कट्टा शेखर टोळीतील भास्कर शेट्टी या दरोडेखोराला दिंडोशी येथे अस्मान दाखविले. याचा धसका चड्डी -बनियन गँगने घेतला आणि मुंबईत गेल्या दोन दशकांत कधी पाय ठेवला नाही याचे श्रेय मुंबई पोलिसांना जाते. च•ाr-बनियन किंवा धाराशिव-सोलापूरमधील दरोडेखोरांच्या टोळ्या पुन्हा एकदा मुंबईवर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. चेहऱ्यावर मुखवटे घालून व अंगाला तेल लावून हे नराधम फक्त चड्डी वर दरोडे घालतात. दिवसा भिकाऱ्याच्या किंवा मजुराच्या वेषात फिरून घरांची रेकी करतात. कचरा गोळा करण्याचेही काम करतात. घरांची, बंगल्यांची पाहणी करून रात्री दरोडा घालतात. अशा या खतरनाक टोळ्या मध्य प्रदेशातून आणि महाराष्ट्रातील काही दुर्गम भागांतून शहरी भागात येत आहेत. समफद्धीसारख्या महामार्गावर दरोडे घालत आहेत. अशा दरोडेखोरांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी कमालीची दक्षता घेणे आवश्यक आहे. आपल्या बंगल्याच्या किंवा घराच्या अवतीभोवती हाय वॅटेजचे दिवे आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. घरात पैसा, दागदागिने किंवा मौल्यवान वस्तू ठेवू नयेत. बँकेत लॉकरमध्ये ते सुरक्षित ठेवले पाहिजेत दरोडेखोर घरात घुसल्यास प्रतिकार करणे टाळावे.
अमोल राऊत