राज्यातील हॉटेल्स, मेस, बेकरींवर एफडीएचे छापे
चहापावडर, मसाल्यांमध्ये आढळली भेसळ : महाविद्यालये अन् कार्यालयांजवळील उपलब्ध खाद्यपदार्थांची तपासणी सुरू
प्रतिनिधी/ बेंगळूर
अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाने (एफडीए) इडली आणि पोळी बनवताना प्लास्टिक शीटच्या वापरावर कडक नियंत्रण ठेवले आहे. दरम्यान, विभागाकडे खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत अनेक तक्रारी ऐकू येत आहेत. या पार्श्वभूमीवर एफडीएने राज्यभरातील हॉटेल्स, मेस आणि बेकरींवर छापा टाकला असून तपासणी सुरू केली आहे.
अन्न तयार करताना भेसळयुक्त मसाल्यांचा वापर आणि गूळ, तेल, पनीर, खवा आणि चहा पावडर यांसारख्या वस्तूंमध्ये निकृष्ट घटक वापरले जात असल्याचे तपासणीवेळी आढळून आले आहे, अशी एफडीए अधिकाऱ्यांनी टीएसआयईला दिली आहे. अलीकडे मंड्या जिल्ह्यात अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आल्यानंतर, विशेषत: महाविद्यालये आणि कार्यालयांजवळ उपलब्ध असलेल्या खाद्यपदार्थांची तपासणी केली जात आहे. या प्रकरणात दोन खासगी शाळेतील विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर अनेकजण अस्वस्थ असल्याचे एफडीएच्या सूत्रांनी सांगितले.
चहा पावडरसह अनेक वस्तूंमध्ये भेसळ असल्याचे आढळून आले. कमी दर्जाचा चहा आणि आधीच वापरलेली चहा पावडर वाळवली जाते आणि त्याला कृत्रिम रंग देऊन पुन्हा वापरला जातो. बहुतेक दुकाने वापरलेली चहा पावडर टाकून देत नाहीत. त्याऐवजी ते वाळवून त्याला कृत्रिम रंग देऊन पुन्हा वापरतात. शिवाय, मिश्र्र मसाले वापरून अनेक खाद्यपदार्थ तयार केले जातात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अधिक मागणी आणि पावडरचय स्वरुपात असलेल्या हळद, मिरची पावडर आणि धने पावडरमध्ये सामान्यपणे भेसळ होत असते. रंग वाढवण्यासाठी हळदीमध्ये अनेकदा मिथेनॉल पिवळा, सिंथेटिक डाई किंवा लीड क्रोमेट मिसळले जाते. हे दोन्ही शरिरासाठी हानिकारक आहेत. तसेच मिरची पावडरमध्ये सुडान रेड सारख्या कृत्रिम रंगाची भेसळ केली जाते. हे कॅन्सरकारक असल्याची माहिती विभागाच्या अधिकाऱ्याने दिली. भेसळयुक्त पदार्थांचे नियमित सेवन केल्यास कालांतराने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशाराही अधिकाऱ्याने दिला.