For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोल्हापुरात अस्वच्छ खवा, लाडू, भेसळयुक्त गुळावर एफडीएची कारवाई

11:35 AM Sep 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
कोल्हापुरात अस्वच्छ खवा  लाडू  भेसळयुक्त गुळावर एफडीएची कारवाई
Advertisement

कोल्हापूर: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कोल्हापूर शहरात कारवाई करत अस्वच्छ पद्धतीने तयार केलेला खवा, बेसन लाडू आणि बुंदी तसेच असुरक्षित व भेसळयुक्त संशय असलेला गूळ जप्त केला. या कारवाईत एकूण ७३६ किलो गूळ तसेच इतर अन्नपदार्थ जप्त करण्यात आले.

Advertisement

कोल्हापूर येथील मे. खत्री ब्रदर्स स्वीट मार्ट येथे केलेल्या तपासणीत स्वच्छतेचे नियम न पाळता उत्पादन करण्यात येत असल्याचे आढळून आल्याने ७ हजार ३२० रुपये किमतीचा २४ किलो खवा, ३ हजार ८४० रुपये किमतीचे बेसन लाडू आणि २ हजार रुपये किमतीची बुंदी जप्त करण्यात आली. तसेच, शाहू मार्केट यार्डमधील मे. तिरुपती ट्रेडर्स येथे घातलेल्या धाडीत ५८६ किलो वजनाचा गुळ भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आला. याची किंमत सुमारे ४३ हजार इतकी आहे.

जप्त केलेल्या अन्नपदार्थाचे नमुने पुढील तपासणीसाठी घेण्यात आले असून, ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेतील अहवाला आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अन्नपदार्थांची स्वच्छता, सुरक्षितता आणि गुणवतेबाबत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर एफडीएकडून कारवाई सुरुच राहणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने कळविण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.