For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एफसी गोवाला कलिंगा सुपर कप फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद

07:11 AM May 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
एफसी गोवाला कलिंगा सुपर कप फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद
Advertisement

क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव

Advertisement

जमशेदपूर एफसीचा 3-0 असा मोठ्या फरकाने पराभव करून एफसी गोवाने कलिंगा सुपर कप फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविला. भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर या स्पर्धेतील अंतिम खेळविण्यात आला. एफसी गोवाने सुपर कप आता दोनदा जिंकला आहे. त्यापूर्वी 2019 मध्ये एफसी गोवाने या चषकावर आपले नाव कोरले होते.

जेतेपदाने आता एफसी गोवाने येत्या फुटबॉल हंगामात एएफसी चॅम्पियन्स लीग -2 फुटबॉल स्पर्धा खेळण्याची पात्रता मिळविली आहे. एफसी गोवासाठी त्यांचे प्रशिक्षक मानोलो माक्वेझ यांचा हा शेवटचा सामना ठरला. ते आता भारतीय फुटबॉल संघाचे प्रमुख प्रशिक्षकपद भुषवतील. एफसी गोवाचे प्रशिक्षकपदी राहताना मानोलोंचेहे पहिलेच जेतेपदही आहे.

Advertisement

यंदाच्या हंगामातील आयएसएल फुटबॉल स्पर्धेत जमशेदपूर एफसीने एफसी गोवाला होम आणि अवे सामन्यांत पराभूत केले होते. काल सुपर कपच्या अंतिम लढतीत जमशेदपूरला आरामात नमवून एफसी गोवाने शानदार वचपा काढला. अंतिम लढतीत एफसी गोवाने जमशेदपूरविरूद्ध निर्विवाद वर्चस्व राखले. सामन्याच्या पहिल्या सत्रात 23व्या मिनिटाला बॉर्जा हर्रेराने प्रतिस्पिर्धी गोलरक्षक आल्बिनो डायसला भेदले व एफसी गोवाला आघाडीवर नेले.

दुसऱ्या सत्रात एफसी गोवाने आणखी दोन गोल केले. प्रथम 51व्या मिनिटाला बॉर्जा हर्रेराने दुसरा गोल केला तर 72व्या मिनिटाला कार्ल मॅकह्यूच्या पासवर ड्रॅझिक ड्रॅझानने गोल करून एफसी गोवाचे जेतेपद निश्चित केले. विजेत्या एफसी गोवाला रोख 25,00,000 व सुपर कप तर उपविजेत्या जमशेदपूर एफसीला रोख 15,00,000 प्राप्त झाले.

Advertisement
Tags :

.