For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फौजी अन् डॉक्टरच्या विवाहाची पत्रिका व्हायरल

06:30 AM Feb 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
फौजी अन् डॉक्टरच्या विवाहाची पत्रिका व्हायरल
Fauji and doctor wedding card
Advertisement

लोकांकडून होतेय अनोख्या निमंत्रण पत्रिकेचे कौतुक

Advertisement

विवाहाच्या निमंत्रण पत्रिकेवर क्रिएटिव्हिटी दिसून येणे तसे पाहिल्यास सामान्य बाब आहे, परंतु सध्या सोशल मीडियावर एक अनोखी निमंत्रण पत्रिका व्हायरल होत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी ही पत्रिका पाहिली असून त्याचे कौतुक करणे कुणालाच रोखता आलेले नाही. तसेच लोकांकडून संबंधित जोडप्याला विवाहाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत.

निमंत्रण पत्रिकेचे डिझाइन एका शर्टप्रमाणे असून याच्या निम्म्या हिस्स्यात सैन्याचा गणवेश दाखविण्यात आला आहे. तर उर्वरित निम्म्या भागात एका डॉक्टरचा कोट दिसून येत आहे. सैन्ययुक्त हिस्स्यात ‘कॅप्टन अदनान’ आणि डॉक्टरच्या डिझाइनमध्ये ‘डॉक्टर रमशा’ असे नमूद आहे. दोन रंगांमधील ही निमंत्रणपत्रिका पाहण्यास अत्यंत साधारण परंतु अनोखी वाटत आहे.

Advertisement

मायक्रोब्लॉगिंग साइट ‘एक्स’वर या निमंत्रण पत्रिकेला अलिकडेच शेअर करण्यात आले होते. याला आतापर्यंत एक लाखाहून अधिक जणांनी लाइक केले आहे. ‘मुहम्मद शोएब’ नावाच्या युजरने या छायाचित्राला कॅप्शन दिली आहे, ‘विवाहाच्या निमंत्रण पत्रिकेचा सर्वात प्रेमळ नमुना’ असे यात नमूद आहे. या जोडप्याला सोशल मीडियावर शुभेच्छा प्राप्त होत आहे. परंतु काही लोकांना ही निमंत्रणपत्रिका पसंत पडलेली नाही.

Advertisement
Tags :

.