फातिमा शेखला मिळाला नवा चित्रपट
लवकरच अन्य क्रिकेटपटूंप्रमाणे आता युवराज सिंहच्या आयुष्यावर चित्रपट निर्माण होणार आहे. टी-सीरिजच्या बॅनर अंतर्गत निर्माण होणाऱ्या या चित्रपटात अभिनेत्री फातिमा सना शेख दिसून येणार आहे. फातिमा या चित्रपटात युवराजच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसून येणार आहे. फातिमा शेखने अद्याप या भूमिकेविषयी कुठलेच वक्तव्य केलेले नाही. परंतु ती या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचे समजते. चित्रपटात युवराज सिंहची भूमिका कोण साकारणार हे निर्मात्यांनी अद्याप जाहीर केलेले नाही.
या चित्रपटाचे दिग्दर्शन रवि भागचंदका करणार आहेत. युवराज सिंहच्या अष्टपैलू कामगिरीमुळे भारताने 2007 मधील टी 20 वर्ल्ड कप तर 2011 मधील एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. युवराजने 2000 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आक्रमक फलंदाजी आणि उत्तम क्षेत्ररक्षणाच्या बळावर चाहत्यांची मने जिंकली होते. युवराज सिंहला कर्करोग झाल्याचे निदान करण्यात आले होते. परंतु त्यावर मात करत त्याने क्रिकेट खेळणे सुरूच ठेवले होते. युवराज याच्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार आणि रवि करतील. रवि याला ‘सचिन : ए बिलियन ड्रीम्स‘ आणि आगामी चित्रपट ‘सितारे जमीं पर’साठी ओळखले जाते.