करण जौहरच्या चित्रपटात फातिमा
लवकरच सुरू होणार चित्रिकरण
निर्माता करण जौहर आता एका नव्या जोडीसोबत चित्रपट साकारत आहे. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. त्याचे प्रॉडक्शन हाउस धर्मेटिक एंटरटेन्मेंट आता एक रोमँटिक चित्रपट तयार करत असून यात आर. माधवन आणि फातिमा सना शेख यांची जोडी दिसून येणार आहे. हा चित्रपट एक अजब प्रेमकहाणी दर्शविणारा असून यात एक मध्यमवयीन पुरुष आणि एक युवा महिलेचे प्रेम दर्शविण्यात येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक सोनी करणार आहे. विवेक सोनीने यापूर्वी मीनाक्षी सुंदरेश्वर या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. लेखिका राधिका आनंद आणि जहान हांडा यांनी या चित्रपटाची कहाणी लिहिली आहे. माधवनला रोमँटिक प्रतिमेत पुन्हा परतण्याची संधी या चित्रपटाद्वारे मिळणार आहे. लवकरच या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू होणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सकरता निर्माण केला जात आहे. करण जौहरने यापूर्वी कोंकणा सेन शर्मा आणि प्रतिमा रांटा यांचा चित्रपट निर्माण करण्याची जबाबदारी उचलली आहे. हा चित्रपट देखील नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.