‘आप जैसा कोई’मध्ये फातिमा
आर. माधवनसोबत जमणार जोडी
आर. माधवन आणि फातिमा सना शेख लवकरच रोमँटिक जोडप्याच्या स्वरुपात दिसून येणार आहेत. नेटफ्लिक्सच्या चित्रपटात दोघेही महत्त्वाची भूमिका साकारणरा आहेत. चित्रपट एक इसम आणि युवतीच्या प्रेमकहाणीला दर्शविणारा असून तो प्रेक्षकांना प्रेम अन् हास्याचे क्षण मिळवून देणार आहे. ा
निर्मात्यांनी ‘आप जैसा कोई’ या चित्रपटाचे पोस्टर जारी केले असून यात आर. माधवन आणि फातिमा सना शेख यांची जोडी दिसून येत आहे. ही एक हृदयस्पर्शी रोमँटिक कहाणी असून ती परिवार, प्रेम आणि नात्यांचे सौंदर्य दाखविणारी आहे. नेटफ्लिक्सचा हा चित्रपट 11 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात आर. माधवन हा श्रीरेणु त्रिपाठी ही भूमिका साकारत असून तो एक शांत अन् संस्कृत शिकविणारा शिक्षक आहे. तर फातिमा यात मधु बोस या व्यक्तिरेखेत असून ती एक उत्साही फ्रेंच भाषेची शिक्षिका आहे. दोघांची भेट एका डेटिंग अॅपवर होते आणि येथून त्यांची मजेशीर आणि भावुक प्रेमकहाणी सुरू होते. हा चित्रपट मुंबई आणि कोलकात्याची पार्श्वभूमी दर्शविणारा आहे.
या चित्रपटात करण वाही आणि नमिता दास देखील मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक सोनी यांनी केले आहे. तर याची निर्मिती करण जौहरकडून करण्यात येत आहे.